शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 02:52 IST

खराब हवामान, रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा नाही; विमाने वळवितात अहमदाबादला

मुंबई : मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द होत आहे. या विमानसेवेला खराब हवामानाचा फटका बसतो आहे, शिवाय रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा जळगाव विमानतळावर उपलब्ध नसल्याने, ही समस्या वारंवार उद्भवत आहे. ‘उडाण’ योजनेमध्ये या विमानतळाचा समावेश केल्यानंतरही प्रवाशांना विमानसेवा मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबईहून जळगावला जाण्यासाठी ट्रुजेटचे विमान चालविले जाते. उडाण योजनेत १ सप्टेंबरपासून विमानसेवा चालविली जात आहे.सकाळी अहमदाबाद येथून हे विमान जळगावला येते. तिथून मुंबईला येते. त्यानंतर, कोल्हापूर व नंतर परतीचा प्रवास केला जातो. मात्र, यामध्ये कंपनीने इंदूरचा समावेश केला आहे. त्यामुळे जळगावात सकाळी साडेदहा वाजता हे विमान येणे अपेक्षित असताना त्याला विलंब होतोे. परिणामी, या विमानाच्या पुढील सर्व उड्डाणांवर परिणाम होतो. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून येणारे विमान जळगावात उतरणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा त्याला विविध कारणांमुळे विलंब होतो.जळगाव विमानतळावर रात्री लँडिंग करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत विमान प्रवास शक्य आहे. सूर्यास्तानंतर विमान जळगावात आल्यास हवाई नियंत्रण कक्षातून विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे हे विमान अहमदाबादकडे वळवले जाते.प्रवाशांचा संतापगेल्या आठवड्यात मुंबईहून आलेले विमान जळगावात न उतरता थेट अहमदाबादला जाण्याचे प्रसंग दोन-तीन वेळा घडले, तर जळगावातून अहमदाबादला जाण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांनादेखील जळगाव विमानतळावर ताटकळत राहावे लागले. मुंबईहून जळगावला जाण्याऐवजी प्रवाशांना अहमदाबादला जावे लागले. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Airportविमानतळ