शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गाने हैराण केले! चंद्रकांत पाटील यांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:36 IST

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे वाहनचालकच नव्हे, तर दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील हेदेखील हैराण झाले असून, तशी कबुुली त्यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रात हैराण करणारे खूप कमी प्रकल्प आहेत. त्यापैकी मुंबई-गोवा महामार्गाने सर्वाधिक हैराण केले आहे, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

मुंबई : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे वाहनचालकच नव्हे, तर दस्तुरखुद्द सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील हेदेखील हैराण झाले असून, तशी कबुुली त्यांनी विधान परिषदेत दिली. महाराष्ट्रात हैराण करणारे खूप कमी प्रकल्प आहेत. त्यापैकी मुंबई-गोवा महामार्गाने सर्वाधिक हैराण केले आहे, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.या महामार्गावरील भूसंपादनाबाबतचे अनेक दावे रखडले आहेत. वेळेत या दाव्यांचा निपटारा होत नसल्याचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुनील तटकरे यांनी मांडला, तर इंदापूरच्या पुढे २८ जणांनी जमिनीच दिली नसल्याने, या वर्षीही मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार नसल्याचे शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले.मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-झारप या दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या भागातील पुलांचे काम पूर्ण झाले आहे.मात्र, पनवेल-इंदापूरचा पहिला टप्पा मात्र रखडल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या टप्प्यातील दावे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकर सुनावण्या घेण्यात येतील, तसेच सोमवारी जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील