लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यटनास आल्याचे भासवून मध्यरात्रीच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील बंद दुकाने फोडून लाखो रुपयांची रोकड व मुद्देमाल लंपास करणाऱ्या मुंबईतील घरफोड्या टोळीस सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. या टोळीमध्ये एका महिलेसह चौघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक आलिशान गाडी व घरफोडीसाठी वापरली जाणारी हत्यारे, चोरीचे मोबाईल, असा सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुस्तफा अब्दुलहमीद पावसकर (वय ३६, रा. सिक्कीनगर, मुंब्रा, ठाणे), नुरमहंमद करीम शेख ऊर्फ लड्डू (४०, रा. कर्नाक बंदर, व्हीटी), दिनेश विजय मुदलियार (३५, रा. मस्जिद बंदर, पी. डी. माला रोड, व्हीटी), फातिमा फिरोज खान (३१, रा. कोळीवाडा, वडाळा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक अशा विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मीपुरी येथील मोबाईल शॉपीसह औषध दुकान फोडल्याची कबुली दिली आहे. यातून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले.
मुंबईतील घरफोड्या टोळीस अटक
By admin | Updated: May 23, 2017 03:30 IST