मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा कोणताही निर्णय किंवा भूमिका भाजपाने घेतलेली नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी स्पष्ट केले. ते पत्र परिषदेत बोलत होते. दानवे म्हणाले की, शिवसेनेशी युती व्हावी हीच आमची आजही भूमिका आहे, पण ती सन्मानाने झाली पाहिजे. २५ वर्षे जुना मित्र असलेल्या शिवसेनेची सोबत सोडण्याची आमची इच्छा नाही. नगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करायची की नाही याचे अधिकार भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
मुंबईत स्वबळाचा अद्याप निर्णय नाही - दानवे
By admin | Updated: October 23, 2016 01:09 IST