लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत असून, येथील उकाड्यात वाढ झाल्याने मुंबईकर घामाघूम होत आहेत. रविवारसह सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील आणि आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, उकाड्यात भरच पडणार आहे. दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून ७ आणि ८ मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहील. ९ मे रोजी मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १० मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबई ढगाळ, राज्यात वादळी पावसाची शक्यता
By admin | Updated: May 7, 2017 04:41 IST