शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

मुंबईत पुन्हा दोन पोलिसांवर हल्ले

By admin | Updated: September 2, 2016 01:31 IST

कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतरही मुंबईत पोलिसांवरील हल्ले सुरूच आहेत. कुलाब्यात गाडी अडवणाऱ्या पोलिसावर माजी नगरसेवकाने

मुंबई : कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे विलास शिंदे यांच्या मृत्यूनंतरही मुंबईत पोलिसांवरील हल्ले सुरूच आहेत. कुलाब्यात गाडी अडवणाऱ्या पोलिसावर माजी नगरसेवकाने हल्ला केला, तर कुर्ला येथे नाकाबंदीच्या वेळी गाडी अडवल्यानंतर पोलीस हवालदाराला धडक देण्याचा प्रकार घडला. गेटवे आॅफ इंडिया परिसरात वाहतूक पोलीस राजेंद्र पवार (४५) हे कर्तव्य बजावत होते. दुपारी तीनच्या सुमारास स्विफ्ट डिझायरमधील चालक फोनवर बोलत कार चालवित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडी थांबवून कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा गाडीत बसलेले माजी नगरसेवक राजेंद्र लोहिया यांनी गाडीबाहेर उतरत, त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पाठोपाठ त्यांचे १० ते १२ बॉडीगार्ड, कार्यकर्ते गाडीबाहेर उतरून पवारना घेरले. ही परिस्थिती बघून मुंबईकर त्यांच्या मदतीला धावून आले. नागरिकांनी पोलिसांना लगेचच ही माहिती दिली. कुलाबा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत, पोलीस ठाण्यात नेले. मुंबईकरांमुळेत आपण बचावलो, असे पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तपासात नगरसेवक विनापरवाना गाडी चालवित असल्याचे समोर आले आहे. चालक अहमद खानला अटक झाली. कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार पोलीस चौकीजवळ नाकाबंदी सुरू असताना पोलीस हवालदार देविदास निंबाळकर यांनी मोटारसायकलस्वाराला थांबण्यासाठी इशारा केला. त्याने गाडी न थांबविता निंबाळकरांच्या अंगावर गाडी घालून पळ काढला. निंबाळकर यांच्यासोबत असलेल्या अन्य सहकारी पोलिसांनी पाठलाग करून इम्तियाज खानला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)काम करायचे की नाही...कुलाबा येथील हल्ल्यात जखमी झालेले वाहतूक पोलीस पवार यांच्या म्हणण्यानुसार, वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आम्ही नियम पाळण्याचे आवाहन करतो. मात्र, त्यांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे असले प्रकार सुरू आहेत. अशा वेळी आम्ही कायद्याने काम करायचे की नाही? असा प्रश्न पडत असल्याची खंत पवार यांनी व्यक्त केली. हे प्रकार या पुढे तरी थांबावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठांच्या दबावातून फक्त एनसीची नोंद पोलीस दलात शिंदे यांचे प्रकरण समोर असतानाही वरिष्ठांच्या दबावातून अंगावर गाडी घालूनदेखील केवळ एनसीची नोंद करण्याचा प्रताप व्ही.बी. नगर पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आमचेच अधिकारी असे करत असतील, तर आम्ही जीव धोक्यात घालून काम का करावे, अशी संतप्त प्रतिक्रि या पोलीस दलातून उमटत आहेत. त्यात जखमी निंबाळकर यांनाही परस्पर डिस्चार्ज घेण्याची घाईही झाल्याची चर्चा व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात होत आहे.