शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ६५ वर्षांत ५१ वेळा २०० मिमी पाऊस, धुवांधार पावसानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:32 IST

मुंबई तसेच कोकणात २९ आॅगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी धुवाधार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते़ संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचे वर्णन तुंबई असे केले गेले़

विवेक भुसे पुणे / मुंबई : मुंबई तसेच कोकणात २९ आॅगस्ट आणि १९ सप्टेंबर या दोन दिवशी धुवाधार पाऊस होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते़ संपूर्ण मुंबईत पाणी साचल्याने मुंबईचे वर्णन तुंबई असे केले गेले़ असे असले तरी ही काही पहिलीच वेळ नाही़ मुंबईत एकाच दिवसात २०० मिमी पाऊस होणे हे सामान्य असल्याचे मागील ६५ वर्षांतील आकडेवारी पाहिली असता दिसून येते़ पुणे हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात १९५० ते २०१५ या ६५ वर्षांत मुंबईत तब्बल ५१ वेळा एका दिवसात २०० मिमी पाऊस झाल्याचे आढळून आले आहे़ त्यामुळे पाऊस हा नेहमीसारखाच असला तरी पावसाच्या पाण्याचे निचरा न होणे हे त्यामागील कारण असल्याचे स्पष्ट होते.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ एक़े. श्रीवास्तव यांनी याबाबत केलेल्या अभ्यासात हे दिसून आले आहे़ मुंबई व कोकण विभागात पावसाळ्यामध्ये एका दिवसात २०० मिमी पाऊस होणे ही तशी सामान्य घटना आहे़ मागील ६५ वर्षांत अनेकदा असे आढळून आले की, एकाच वर्षात एकाच दिवसात २०० मिमी पाऊस दोनदा किंवा काही वेळा तीनदा पडला आहे़मुंबई व कोकणात पडणारा इतका पाऊस हा हवामानाच्या दृष्टीने पाहिले तर सर्वसाधारण आहे़ मागील पाच वर्षांचा विचार केला तर २०११ मध्ये २८ व २९ आॅगस्टला सांताक्रूझ येथे अनुक्रमे २२०़४ मिमी व २३२ मिमी पाऊस पडला होता़ त्यानंतर २०१२ मध्ये एका दिवसात इतका पाऊस झाला नाही़ २४ जुलै २०१३ रोजी २१५़६ मिमी, ३ जुलै २०१४ रोजी २०७ मिमी व १९ जुलै २०१५ रोजी २८३ मिमी पाऊस एकाच दिवशी पडला होता़ तसेच २००९ मध्ये ५ व १५ जुलै, २००७ मध्ये २४ जून आणि १ जुलै तसेच २००५ मध्ये तर ५ व २७ जुलै व १ आॅगस्ट अशा एका वर्षात दोन किंवा तीन वेळा एकाच दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईत पडला़ हे पाहता एका दिवशी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस मुंबईमध्ये साधारणपणे नियमित होत असतो़१९५० ते २०१५ या ६५ वर्षांत ५१ वेळा एकाच दिवसात २०० मिमी पाऊस झाला होता़१० वर्षांमध्ये एकाच पावसाळ्यात २ वेळा २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस.२ वर्षे एकाच हंगामात तीन वेळा २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस (१९५८ आणि २००५ ).१९५२ मध्ये ४ वेळा एकाच दिवसात २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस़