यवतमाळ : पोलीस मोटर परिवहन विभागातील (एमटी) १० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) खुली चौकशी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी जारी केले आहेत. सन २००८ ते २०११ या तीन वर्षांत पोलीस मोटर परिवहन विभागाच्या औरंगाबाद, नागपूर, ठाणे, पुणे या कार्यशाळांमध्ये पोलीस वाहनांसाठी दिल्ली मेड स्पेअरपार्ट खरेदी करून १० कोटी ४४ लाख ६४ हजार ७२४ रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक प्रकाश आचरेकर यांनी यासंबंधीचा अहवाल पोलीस महासंचालकांना सादर केला होता. त्यावर गेल्या महिन्यात महासंचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून या घोटाळ्याची खुली चौकशी करण्याचे आदेश दिले. या घोटाळ्यात पोलीस मोटर परिवहन विभागाचे दोन पोलीस महानिरीक्षक, अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षक, भांडार प्रमुख, पर्यवेक्षक त्यांच्या अधिनस्त लिपिकवर्गीय यंत्रणा हे अडकण्याची चिन्हे आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
‘एमटी’ गैरव्यवहाराची एसीबी चौकशी
By admin | Updated: September 24, 2015 02:06 IST