शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणने ७५२१ तक्रारीचे केले जागेवरच केले निरसन

By appasaheb.dilip.patil | Updated: July 31, 2017 13:23 IST

सोलापूर दि ३१ :ग्राहक संपर्क अभियानात प्राप्त झालेल्या ८९७८ पैकी ७५२१ अर्ज व तक्रारींचे जागेवरच निरसन करून वीजग्राहकांचे समाधान करण्यात आले.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ : पश्चिम महाराष्ट्रात महावितरणने ग्राहक संपर्क व संवाद वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या ग्राहक संपर्क अभियानात प्राप्त झालेल्या ८९७८ पैकी ७५२१ अर्ज व तक्रारींचे जागेवरच निरसन करून वीजग्राहकांचे समाधान करण्यात आले. तर प्रलंबित राहिलेल्या १४६७ तक्रारींचे ठराविक मुदतीत निराकरण करून त्याची माहिती संबंधीत वीजग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरु आहे.राज्याचे ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा राज्यभरातील दौºयात नागरिकांशी थेट संवाद उपक्रम सुरु होता़ त्याच धर्तीवर महावितरणला ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले होते़ त्यानुसार महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ११ ते १९ जुलैपर्यंत ग्राहक संपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महावितरणच्या अधिकाºयांनी प्रत्येक शहर व तालुकास्तरावर अभियान राबवून ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या़इन्फो बॉक्स़़़़़़़़़अभियानाच्या कामगिरीवर एक नजऱ़़या अभियानात पुणे जिल्ह्यात ५७०७ पैकी ५०५४ अर्ज व तक्रारींवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात ८६४ पैकी ५५६, सांगली जिल्ह्यात ८२५ पैकी ६४१, सोलापूर जिल्ह्यात ५४३ पैकी ३०३ व सातारा जिल्ह्यात १०३९ पैकी ९६७ अर्ज व तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले. या अभियानात प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, मुख्य अभियंता एम.जी. शिंदे (पुणे), नागनाथ इरवाडकर (बारामती) व किशोर परदेशी (कोल्हापूर) यांनीही सहभागी होऊन वीजग्राहकांशी संवाद साधला व ग्राहकसेवेसंदर्भात अपेक्षा जाणून घेतल्या. यासोबतच इतर अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनीही तालुका व उपविभागनिहाय अभियानाचे आयोजन करून वीजग्राहकांचे अर्ज व तक्रारी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. हे अभियान आता नियमित स्वरुपात राबविण्यात येणार असून त्यासंबंधी लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार आहे.इन्फो बॉक्स़़़़़़़या तक्रारींचे झाले निरसनवीजग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी, नावात बदल, पत्त्यात बदल, वीजभार आदींसाठी अर्ज मंजुरी तसेच सदोष किंवा चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतर तक्रारी सोडविण्यात आल्या़ नवीन वीजजोडणी व इतर अर्जाच्या मंजुरीची व विजसेवेविषयक तक्रारी निरसनची प्रक्रिया जागेवरच करण्यात आली़ या अभियानास वीजग्राहकांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला.