शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
3
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
4
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
5
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
6
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
7
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
8
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
9
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
10
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
11
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
12
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
14
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
15
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
16
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
17
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
18
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
19
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
20
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती

महावितरणला महिन्याला १२०० कोटींचा फटका; थकबाकी ८ हजार कोटींच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 5:50 AM

Mahavitaran : कोरोना काळातील पहिल्या सात महिन्यांत महावितरणने ३०,८८२ कोटी रुपयांची बिले घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिली.

संदीप शिंदेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोना दाखल होण्यापूर्वी महावितरणची थकबाकी ५१,१३६ कोटी होती. कोरोना संक्रमणाच्या सात महिन्यांत ती तब्बल ५९,१८२ कोटींवर झेपावली. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत सुमारे दीड हजार कोटींची बिले थकली होती. यंदा तो आकडा तब्बल ८ हजार कोटींच्याही पुढे गेला आहे. शिवाय वीज खरेदी आणि वीजपुरवठ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील तफावतही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कोरोना काळातील पहिल्या सात महिन्यांत महावितरणने ३०,८८२ कोटी रुपयांची बिले घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना दिली. त्यापैकी जेमतेम २२,८५६ कोटी रुपयांच्या बिलांचा भरणा झाला. महिन्याकाठी सरासरी ४४०० कोटींची बिले दिली जात असली, तरीभरणा मात्र ३२०० कोटींच्या आसपास आहे.

राज्यातील वीज ग्राहकांकडूनथकबाकी वसुली करण्यासाठी  धडक मोहीम राबवा, असे ऊर्जामंत्र्यांनी काही दिवासांपूर्वी विभागातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे. परंतुया मोहिमेला अद्याप म्हणावी अशी गती मिळू शकलेली नाही.मोफत वीज योजनेचा स्वप्नभंग१०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना मोफत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणूकपूर्व प्रचारात दिले होते. सरकार स्थापनेनंतर ऊर्जामंत्र्यांनी या घोषणेचा पुनरुच्चार केला. मात्र, त्यापोटी वार्षिक ८ हजार कोटींची तूट येण्याची चिन्हे असून सध्याच्या आर्थिक कोंडीच्या काळात राज्य सरकारकडून ती भरून मिळण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे सुमारे एक कोटी वीज ग्राहकांचे मोफत विजेचे स्वप्न साकार होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.ॲक्शन प्लॅन : काेराेनामुळे आर्थिक संकटात अडकलेले ग्राहक तसेच सरकारने १०० युनिटपर्यंत मोफत वीज आणि वाढीव बिलांमध्ये सवलत या घोषणांची पूर्तता अद्याप न केल्याने कारवाई सुरू केल्यास विरोधकांकडून त्याचे भांडवल करून प्रखर आंदोलने सुरू होण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे ग्राहकांना फोन, ई-मेल करा, त्यांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा, जनजागृती मोहीम असा मवाळ ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

 

 

ReplyForward

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज