शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘MPSC’तच दिव्याखाली अंधार; सरकारला मनुष्यबळ पुरविणाऱ्यांना कर्मचाऱ्यांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 09:49 IST

एमपीएससी’तील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरल्या तरी ‘एमपीएससी’वरील मेगाभरतीमुळे वाढलेला कामाचा बोजा पेलण्यास मनुष्यबळ अपुरे आहे

रेश्मा शिवडेकर 

मुंबई : एकामागोमाग एक जाहिरातींचा धडाका लावून राज्य सरकारला मनुष्यबळ पुरविणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्यसेवा आयोगा’ला (एमपीएससी) स्वत:ला मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे भरतीप्रक्रिया राबविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

‘एमपीएससी’तील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या सगळ्या जागा भरल्या तरी ‘एमपीएससी’वरील मेगाभरतीमुळे वाढलेला कामाचा बोजा पेलण्यास मनुष्यबळ अपुरे आहे. म्हणून  १५० ते २०० पदे  वाढविण्याची मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली आहे. कोरोनानंतर आता जागांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी ‘एमपीएससी’ने भरतीचा धडाका लावला आहे. २०२०पासून ‘एमपीएससी’ने तब्बल २२ हजार पदे भरली. आणखी २० ते २१ हजार जागांची भरती सुरू आहे. मात्र, ‘बॅकलॉग’ भरताना ‘एमपीएससी’च्या मर्यादित मनुष्यबळाला तारेवरची कसरत करावी लागत असल्याची व्यथा एका अधिकाऱ्याने बोलून दाखवली. 

‘एमपीएससी’कडे एकूण २७२ मंजूर पदे आहेत. मात्र त्यातील ‘असिस्टंट डेस्क ऑफिसर’ची ९६ पैकी २५ पदे रिक्त आहेत, तर लिपिकांपैकी ६५ पैकी ४५ पदे रिक्त आहेत. सरकारकडून आलेल्या जागांच्या मागणीपत्रानुसार जाहिरात काढणे, भरतीचे नियम, निकष ठरविणे, लेखी परीक्षेचे, मुलाखतींचे नियोजन, निवड यादी तयार करणे आदी कामांची जबाबदारी यांच्यावर असते. परंतु, ही पदे पूर्णपणे भरलेली नसल्याने कामाचा ताण असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.मुंबईसह राज्यभरातील क वर्ग (लिपिक) कर्मचाऱ्यांची भरतीही ‘एमपीएससी’मार्फत केली जाणार आहे. त्यामुळे कामात आणखी वाढ होणार आहे. आणखी १५० ते २०० पदे वाढवून द्यावी, अशी मागणी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनेने केली आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

केरळ सेवा आयोगाचे उदाहरण‘एमपीएससी’तील काही अधिकाऱ्यांनी नुकताच केरळमध्ये जाऊन तेथील सेवा आयोगाचा अभ्यास केला. हा आयोग केरळमधील सर्व वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल अडीच ते तीन हजार पदांची भरती दरवर्षी करतो. त्यांच्याकडे साधारणपणे १,५७१ इतके अधिकारी-कर्मचारी कार्य़रत आहेत. या अभ्यासानंतर ‘एमपीएससी’तही पदे वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा