शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 02:57 IST

आयोगाकडून प्रवेशपत्र जारी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित ‘गट ब’ ची रविवारची परीक्षा देणारे विद्यार्थी सध्याची कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून निवेदन दिले आहे. दुसरीकडे लोकसेवा आयोगाकडून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रिंट काढून घ्या, त्यावरच परीक्षेला प्रवेश दिला जाईल, अशा सूचनांचे पत्रक काढून परीक्षा रविवार ११ एप्रिलला होणार, यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी मुंबई, पुण्यात अभ्यास करतात. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे ते आपल्या मूळ गावी परतले आहेत. मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे केंद्रांवर वेळेत कसे पोहचणार? काहींच्या घरी त्यांचे नातेवाईक पॉझिटिव्ह आल्याने परीक्षा कशी देऊ शकणार? परीक्षा दिली नाही तर काहींची असलेली ही शेवटची संधी असल्याने ती मोजली जाणार का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. एमपीएससी समन्वय समितीने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षा केंद्रे दूर असल्याने आणि त्याच दिवशी लॉकडाऊन असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. मात्र, योग्य प्रवेशपत्राच्या आधारावर उमेदवारांना प्रवासासाठी सूट मिळणार आहे, असे सरकारच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आल्याने आयोग निर्णयावर ठाम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.६५ टक्के तरुणांना परीक्षा नको११ तारखेची परीक्षा घेतली जावी की नाही, यासंदर्भात विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण घेतले असता १ हजार ९३ तरुणांनी नको (६५%) तर ५९६ (३५%) विद्यार्थ्यांनी परीक्षा व्हावी, असे मत मांडले. काही विद्याथ्यार्ंनी परीक्षा अगदी जवळ आल्याने परीक्षा होऊन जाऊ द्या, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMPSC examएमपीएससी परीक्षा