शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

४०० डॉलरसाठी चोरला एमपीएससीचा डेटा; हॉल तिकीट लीक करणारा सायबर पोलिसांकडून गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 08:28 IST

एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरून उमेदवारांचे हॉल तिकीट चोरणाऱ्याला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तो सायबर आणि डिजिटल सायन्सचा विद्यार्थी असून द्वितीय वर्षात शिकत आहे. डार्क नेटवरून मिळालेल्या ४०० डॉलरच्या सुपारीसाठी त्याने हा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे.

एमपीएससीच्या उमेदवारांचे प्रवेशपत्र लीक झाल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेनुसार सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विजय वाघमारे यांनी सहायक निरीक्षक सागर गवसणे, उपनिरीक्षक आकाश पाटील, मोहन पाटील आदींचे पथक तयार केले होते. त्यांनी एमपीएससीची वेबसाइट हॅक करण्यासाठी वापरल्या गेलेल्या इंटरनेटद्वारे आयपीचा शोध घेतला. त्याद्वारे रोहित कांबळे (१९) यांच्यापर्यंत सायबर पोलिस पोहाेचले. पुण्याच्या चिखली येथे राहणारा रोहित सायबर अँड डिजिटल सायन्सचे शिक्षण घेत आहे. यापूर्वी त्याने सायबर सिक्युरिटी, हॅकिंग यांचे कोर्सदेखील केलेले आहेत. 

हॅकर्सच्या संगतीमुळे गुन्हेगारी मार्गालाहॅकर्सच्या संपर्कात आल्याने तो गुन्हेगारी मार्गाला लागला होता. त्याच्या महागड्या जीवनशैलीवरून त्याने यापूर्वीदेखील काही गुन्हे केले असल्याची शक्यता पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. याप्रसंगी सहआयुक्त संजय मोहिते, अपर आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते.

डार्कनेटद्वारे होता हॅकर्सच्या संपर्कातडार्कनेटच्या माध्यमातून तो काही हॅकर्सच्या संपर्कात होता. त्याच ठिकाणी त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून प्रश्नपत्रिका व प्रवेशपत्र हॅक करण्याची ४०० डॉलरची सुपारी मिळाली होती. मात्र, वेबसाइटवर केवळ प्रवेशपत्रिका असल्याने त्याने ९४ हजार प्रवेशपत्रिका चोरून त्या टेलिग्रामवरील ग्रुपवर टाकल्या होत्या. यामुळे हा प्रकार उघड झाला होता. त्याची आई शिक्षिका तर वडील पत्रकार आहेत. सायबर विषयात आवड असल्याने त्याने त्याच विषयात शिक्षण घेण्याचे ठरवले होते.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा