शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

खासदार गोपाळ शेट्टी यांचा पालिकेला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 22:18 IST

क्लीन अप मार्शलकडून दंड ठोठावण्याच्या पालिकेच्या या योजनेविरोधात भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेला घरचा आहेर दिला आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 14 - कचरा फेकणाऱ्यांवर पालिकेच्या क्लीन अप मार्शलकडून दंड ठोठावण्याच्या पालिकेच्या या योजनेविरोधात भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पालिकेला घरचा आहेर दिला आहे. पहिला असलेला कचरा उचला मग दंड लावा असे खडे बोल त्यांनी पालिकेला सुनावले आहेत. त्यामुळे पालिकेच्या क्लीन अप मार्शल योजनेबद्दल आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बोरिवली पश्चिम साईबाबानगर येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी या योजनेबद्दल आसूड ओढले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि एका राज्याचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेचा स्वच्छतेत देशातील 500 शहरांमध्ये 29वा क्रमांक लागतो हे मुंबई महानगरपालिकेला भूषणावह नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे मुंबईत आहे तो कचरा रोज साफ करा असे परखड मत त्यांनी मांडले.दरम्यान लोकमतने स्ट्रिंग ऑपरेशन केल्यावर अंधेरी तसेच दादर रेल्वे स्थानक पूर्व येथील टपरीच्या बाहेर आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पालिकेचे क्लीन अप मार्शल लपून उभे असतात.आणि नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यावर त्याला गुन्हेगाराप्रमाणे दुय्यम वागणूक देऊन त्यांच्याकडून दमदाटी करून सर्रास दंड आकारतात आणि तोडपाणी देखील करतात असे आढळून आले आहे. या प्रकरणी नागरिकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की,जर आम्ही कचरा टाकला असेल तर दंड करा परंतू एकाद्या गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देऊ नका. नागरिकांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण पालिकेने क्लीन अप मार्शल यांना देणे गरजेचे असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.