शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

अकोला शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचाली

By admin | Updated: May 27, 2014 18:54 IST

वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना मनपाच्या नाकी नऊ येत असल्यानेच शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुषंगाने येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आमदार गोपीकिशन बाजोरिया, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, मजीप्राचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपातील शहर अभियंता आदींचा समावेश राहील.

अकोला: वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना मनपाच्या नाकी नऊ येत असल्यानेच शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुषंगाने येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आमदार गोपीकिशन बाजोरिया, मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, मजीप्राचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपातील शहर अभियंता आदींचा समावेश राहील. शहराची वाढती लोकसंख्या, मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची होणारी चोरी, अनधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या व त्या तुलनेत वसूल होणारी पाणीप˜ी आदी विषय लक्षात घेतल्यास, मनपाच्या मूळ उद्देशाला बगल देण्यात आल्याचे समोर आले आहे. २००७ पर्यंत अकोला शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे होती. मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी ही योजना मनपाकडे घेतली. पाणीप˜ी वसूल झाल्यास मनपाच्या तिजोरीत रक्कम जमा होईल,असा आशावाद तत्कालीन प्रशासनाला होता; परंतु झाले उलटेच. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली नगरसेवक व अधिकार्‍यांनी हातमिळवणी करीत स्वत:चे खिसे भरण्यात धन्यता मानली. प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात सबमर्सिबल पंप, हातपंप व किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी फुटकळ कामांना महत्त्व देऊन जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून अक्षरश: मनपाच्या तिजोरीला ओरबडण्याचे काम सुरू आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून शहर पाणीपुरवठ्याची योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात सतत लक्षवेधी उपस्थित केल्या. मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीसुद्धा मध्यंतरी मुंबईस्थित नरीमन पॉइंट येथील मजीप्राच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत संपर्क साधला. तसेच स्थानिक अधिकार्‍यांसोबत बैठकही घेतली होती. या सर्व बाबी पाहता, २८ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्यावर बैठकीचे आयोजन केले आहे.**  बीडची पाईप लाईन हडपतत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांनी कापशी तलावाची बीडची पाईप लाईन चोरीला जात असल्याची सबब पुढे करीत ती खोदण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी पीव्हीसी पाईपची लाईन जोडण्यात आली. पुढे बीडची अख्खी पाईप लाईन हडप करण्यात आली.

** शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास व पाणीप˜ीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्यास मनपा अपयशी ठरली. मजीप्रा पाणीपुरवठा करणारी सक्षम यंत्रणा असल्याने हस्तांतरणाचा पर्याय शिल्लक आहे. - आमदार गोपीकिशन बाजोरिया