शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पेट्रोलपंप चालकांचे बुधवारपासून आंदोलन

By admin | Updated: May 9, 2017 02:05 IST

कमिशन वाढीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी, १० मे पासून पेट्रोल खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कमिशन वाढीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेट्रोलपंप चालकांनी बुधवारी, १० मे पासून पेट्रोल खरेदी न करण्याचा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना कोणताही त्रास होणार नसला, तरी मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढील आठवड्यापासून दर रविवारी आणि सोमवारपासून रात्रीच्या वेळी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा इशारा फामपेडा या वितरकांच्या संघटनेने दिला आहे. सरकार आणि तेल कंपन्या पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांबाबत उदासीन असल्याचा आरोपही फामपेडाने केला आहे.फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वचंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल डिलर्सच्या अडचणीबाबत शासनाने एक समिती तयार केली होती. या समितीने तीन वर्षांपूर्वी शासन दरबारी अहवाल सादर केला आहे. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. सध्या पेट्रोलपंप चालकांना डिझेलला प्रति लीटर १ रूपया ४८ पैसे, तर पेट्रोलला प्रति लीटर २ रुपये ४५ पैसे इतके कमिशन मिळते. याउलट पेट्रोलपंपाचा व्यवस्थापन खर्च, नियमांचे पालन, सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत अपुरे आहे. त्यामुळे हा व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत आहे.कमिशनवाढीचा निर्णय न झाल्यास पेट्रोलपंप चालक आपल्या खर्चात बचत म्हणून रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी पंपावरील व्यवहार बंद ठेवतील. शिवाय सोमवारी, १५ मेपासून रोज एकाच शिफ्टमध्ये काम करताना प्रत्येक पेट्रोलपंप सकाळी ९ वाजता पेट्रोल व डिझेलची विक्री सुरू करून सायंकाळी ६ वाजल्यानंतर पेट्रोलपंप बंद ठेवतील. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत ग्राहकांची मोठी गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली आहे.