शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

‘चित्रकृतींचे दहन’ आंदोलन करणार !

By admin | Updated: February 4, 2017 01:50 IST

बेरोजगार कला शिक्षक आक्रमक; शासनाच्या नियुक्ती धोरणाचा निषेध.

वाशिम, दि. 0३- राज्य शासनाने कला शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे हजारो कला शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणच्या कला शिक्षकांनी स्वनिर्मित चित्रकृतींचे दहन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. वाशिम जिलतील गणेश वानखडे या चित्रकाराच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ फेब्रुवारीला हे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य शासनाने काही वर्षांपासून कला शिक्षकांची पदे भरलेली नाहीत. त्यातच शासनाने शालेय स्तरावरील कला शिक्षकांचे नियमित पद न भरता अतिथी कला निदेशक पद भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शंभरहून अधिक पटसंख्या असणार्‍या शाळांत किमान ५0 रुपये तासिकेनुसार आणि अधिकाधिक पाच हजार रुपये मासिक मानधन देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी असलेल्या शाळांतील कला शिक्षक बेकारच झाले आहेत.धक्कादायक बाब म्हणजे, ह्यअतिथी कला निदेशक म्हणून विनामानधन काम करण्यास तयार आहे,ह्ण असे प्रतिज्ञापत्र या पद भरतीमध्ये कला शिक्षकांकडून शंभर रुपयाच्या बॉन्डवर लिहून घेतले जाते. शासनाच्या या धोरणामुळे कला शिक्षकांत संतापाची लाट उसळली आहे. याचा निषेध करण्यासाठी मंगरुळपीर येथील गणेश वानखडे यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या बेरोजगार कला शिक्षकांना एकत्र आणून त्यांच्या स्वनिर्मित चित्रकृतींचे दहन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनासाठी त्यांना सांगली, पुणे, अकोला, अमरावती, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या कला शिक्षकांनी पाठिंबा दिला आहे. दरम्यान, दहनापूर्वी या चित्रांचे प्रदर्शन भरवून लोकांना या आंदोलनाची माहिती देण्यात येणार आहे. या संदर्भात वानखडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठविले आहे.शासनाने कला विषयासाठी अतिथी निदेशकाचे पद न भरता कला शिक्षकाचे नियमित पद भरावे, तसेच कार्यरत अतिथी कला निदेशकांना सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी चित्रकृती दहन आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाला राज्यभरातील ५0 हून अधिक कला शिक्षकांचा पाठिंबा आहे.-गणेश वानखडे,चित्रकार, मंगरुळपीर.