शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नाणारचे आंदोलन म्हणजे भाजपा-सेनेचे ‘मॅच फिक्सिंग’!  विखे पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:41 IST

कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरू असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपाशी केलेल्या एका डीलचा भाग असून, हे भाजपा-शिवसेनेचे मॅच फिक्सिंग असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

मुंबई : कोकणातील नाणार प्रकल्पाविरोधात सुरू असलेले शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपाशी केलेल्या एका डीलचा भाग असून, हे भाजपा-शिवसेनेचे मॅच फिक्सिंग असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.ते म्हणाले, मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा आहे.परंतु, हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप मस्तकी यायला नको म्हणून भाजपाने शिवसेनेला हाताशी धरले आहे. दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपाने सुरुवातीला या प्रकल्पाची रदबदली करून काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा, असे हे कारस्थान असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.या प्रकरणामध्ये भाजपा-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पाहत आहेत. एकीकडे शिवसेनेचे उद्योगमंत्री विधानसभेत हा प्रकल्प रद्द केल्याचे सांगतात, तर दुसरीकडे भाजपाचे केंद्र सरकार या प्रकल्पाला विविध प्रकारच्या मान्यता देते, हा दुटप्पीपणा असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.राज्य सरकारने केलेली शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर फक्त ‘सेल्फ प्रमोशन’साठीच केली होती, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली. कर्जमाफीनंतर मागील तीन महिन्यांत झालेल्या ६९६ शेतकरी आत्महत्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील एका शेतकºयाने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केल्याच्या घटनेबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील