शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र मागे हटल्यास डोंगर कोसळणार नाही

By admin | Updated: September 6, 2015 02:14 IST

फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा म्हणून यापूर्वी प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात या आंदोलनाला राजकीय वळण लागले.

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा म्हणून यापूर्वी प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात या आंदोलनाला राजकीय वळण लागले. केंद्र सरकारने दोन पावले मागे घेतल्यास डोंगर कोसळणार नाही, असे मत नोंदवून भाजपाचे खासदार, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केंद्र सरकारला घरचा अहेर दिला.पुण्यात शुक्रवारी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय लिटररी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास आले असता सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाला तीन महिने होत आले. सिन्हा म्हणाले, की या प्रश्नासंदर्भात विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला नसतानाही एक ठोस भूमिका घेऊन केंद्र सरकारशी चर्चा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. केजरीवाल य्यांनी दिल्लीत तात्पुरत्या स्वरूपात संस्था सुरू करण्याची तयारी त्यांनी दाखविली होती. कायमस्वरूपी संस्थाही सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता. पण ती दीर्घकालीन प्रक्रिया असल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नसल्याचे ते म्हणाले. अध्यक्षपद स्वीकारण्यात माझी इच्छा नाही. (प्रतिनिधी)