शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

‘मदर स्कूल’ रोखणार ‘माध्यमिक’ची गळती!

By admin | Updated: November 7, 2016 06:05 IST

प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.

धुळे : प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.माध्यमिक स्तरांवरील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाप्रमाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक मुले असलेल्या शाळांना यापुढे ‘मदर स्कूल’ संबोधण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून काही मुले माध्यमिक शाळेत जात नसल्यास त्यांना शोधून पटावर आणण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आलेली आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी ‘मदर स्कूल’ निश्चित कराव्यात. त्या शाळांच्या माध्यमातून इयत्ता आठवी पास सर्व विद्यार्थी इयत्ता नववीत दाखल होतील, याची खात्री करावी. १०० टक्के मुलांच्या प्रवेशाची शहानिशा करण्यासाठी ‘सरल’ संगणक प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या मूल्यांकनात राज्याला प्रथम तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. भाषा, गणितावर भरकार्यक्रमाच्या सुरुवातीची दोन वर्षे फक्त भाषा व गणितातील क्षमता वाढविण्यासाठी देण्यात येणार आहे. नववीची १०० टक्के मुले दहावीत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शाळांकडून नववीत मुलांना मुद्दाम नापास करण्याला चाप बसणार आहे.विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी प्रत्येक शाळेच्या पातळीवर बायोमेट्रिकची बोगस उपस्थिती नोंदवण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी म्हणून स्पोकन इंग्लिशवर भर देण्यात येणार आहे. त्यात श्रवण, लेखन व संभाषण कौशल्याचा समावेश असेल. माध्यमिकशाळाही लोकसहभागातूनडिजिटल व ई-लर्निंग करण्यावर भर असेल. (प्रतिनिधी)