शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जननी सुरक्षेचे कवच अडीच लाख मातांना

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

राज्यभरात माता मृत्यूचा दर घसरला

वाशिम: ग्रामीण व शहरी भागात सुरक्षित प्रसुतीला प्रोत्साहन देणे तसेच माता व अर्भक मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. २00९ ते मार्च २0१४ या पाच वर्षांमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत १७.१२ लाख महिलांच्या प्रसुती झाल्या असून, मृत्यूचे प्रमाण १0४ वरून ८0 पर्यंत घसरले असल्याची साक्ष आरोग्य सेवा संचालनालयाची आकडेवारी देत आहे.आदिवासी, दुर्गम भागातील तसेच गोरगरीब महिलांची प्रसुती डॉक्टरांच्या निगराणीत किंवा दवाखान्यात होत नसल्याने माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे, हे आरोग्य विभागासमोर आव्हानच ठरले होते. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना सुरू केली. दारिद्रय़रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील १९ वर्षावरील मातांचा मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर कमी करणे हा मुख्य उद्देश या योजनेमागे आहे. दवाखान्यात प्रसुती होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लाभार्थी महिलेस अनुदानही दिले जाते. या योजनेंतर्गत संस्थेमधील प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत ग्रामीण भागातील लाभार्थीस ७00 रुपये आणि शहरी भागातील लाभार्थीस ६00 रुपये दिले जाते. कुशल दाईच्या मदतीने घरी प्रसूत होणार्‍या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थीस ५00 रुपये दिले जातात. शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झालेल्या लाभार्थीस १५00 रुपये दिले जातात. २00९-१0 या आर्थिक वर्षात राज्यभरातील तीन लाख ४८ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी राज्य शासनाने २७ कोटी ४१ लाख रुपयांच्या खर्चाचा बोजा सहन केला. २0११-१२ मध्ये सर्वाधिक, अर्थात चार लाख पाच हजार महिलांची प्रसुती दवाखाना किंवा दाईच्या निगराणीत झाली असून, अनुदानापोटी राज्य शासनाने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले आहेत. २0१३-१४ या आर्थिक वर्षात राज्यभरातील दोन लाख ४१ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यावर राज्य शासनाने २८ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले आहेत. या योजनेचा चांगले परिणाम दिसून माता मृत्यूदर खाली आला आहे. राज्यात २00७-0८ मध्ये माता मृत्यूदर प्रत्येक हजार प्रसुतींमागे १0४ होते. २0११-१२ मध्ये ते ८७ पर्यंत घसरले. २0१२-१३ मध्ये हेच प्रमाण ८0 पर्यंत घसरले.