शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

मृत मुलाचे अवयव आईने केले दान!

By admin | Updated: January 16, 2016 02:09 IST

मुलाचे अवयव मरणोत्तर दान करून माऊलीने घालून दिला आदर्श.

मेहकर : ज्या मुलाला नऊ महिने पोटात ठेवलं तो या जगातून एकाएकी निघून जाणे कुठल्याही माऊलीसाठी क्लेषदायकच असते; मात्र मेहकर तालुक्यातील एक माता या धक्कातून सावरली. आपला मुलगा गेला; मात्र दूसर्‍याच्या पोटचा गोळा वाचला पाहिजे म्हणून मुलाचे अवयव मरणोत्तर दान करून या माऊलीने आदर्श घालून दिला आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मंदाबाई मगर यांना राम व श्याम अशी दोन मुले. पती सुधाकर मगर यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे खचलेल्या मंदाबाईंनी मुलांचा सांभाळ केला. मुलगा राम सुधाकर मगर (२४) याने बीएससी कृषी पदवी प्राप्त केली; त्यामुळे आता आईला आरामात जीवन जगता येईल, अशी स्वप्ने राम पाहत होता. बीएससी झालेला राम मगर १२ जानेवारी रोजी अकोला येथे नोकरीसाठी मुलाखत द्यायला गेला. मोटारसायकलवरून देऊळगाव माळी येथे आपल्या गावी परतत असताना मालेगाव तालुक्यातील चांडसनजीक त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला. रामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रामला तत्काळ औरंगाबाद येथे हलविण्यात आले. १४ जानेवारी रोजी रामची जीवनयात्रा अध्र्यावरच संपली; अन् रामच्या आईवर मोठे संकट कोसळले. माऊलीच्या दु:खाला पारावार राहिला नाही. त्यावेळी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी रामचे अवयव दान करण्याची संकल्पना आईसमोर मांडली. आईनेही आपल्या दु:खाला आवर घालत रामचा देह जीवंत नसला तरी, त्याचे अवयव दान करून आपला मुलगा कुणाच्या तरी देहात जीवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. चार जणांना मिळणार जीवनदानरामच्या कुटुंबाने अवयव दान करण्यास होकार दिल्यानंतर आवश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना बोलविण्यात आले. हृदय घेण्यासाठी चेन्नई येथून, तर लिव्हर घेण्यासाठी मुंबईहून डॉक्टरांची चमू आली. एका किडनीचे प्रत्यारोपण औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये करायचे आणि दुसरी मुंबईला पाठवायचे ठरले. अवयव सुरक्षित आणि वेळेत पाठविण्यासाठी एअर अँम्बुलन्सची व्यवस्थाही करण्यात आली. रामचे हृदय, किडनी व लिव्हर दान केल्यामुळे चार जणांना जीवनदान मिळणार आहे.देऊळगावमाळी येथे संक्रात दु:खात आयुष्याच्या उतारवयात ज्या मुलाच्या खांद्याचा आधार घ्यायचा तो पोटचा गोळा एकाएकी निघुन गेल्याने; आईच्या अश्रुंचा बांध फुटला. २४ वर्षीय राम अध्र्यावरच सर्वांना सोडून गेल्याने मेहकर तालुक्यातील देऊळगावमाळी गाव शोकसागरात बुडाले असून, १५ जानेवारी रोजी मकरसंक्रातीच्या सणावर गावात दु:खाचे सावट होते.