शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आई कुणा म्हणू मी...? अल्पवयीन मुलीचे पालकत्व स्वीकारण्यास मातेचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 07:57 IST

आजी-आजोबा झाले पालक

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आई ही मुलांचे सर्वस्व असते. त्यांचे संगोपन, पालनपोषण करणे, संस्कार घडविणे ही निसर्गत: जबाबदारी आईवरच असते. ठरावीक वयापर्यंत मुलांना आईचाच आधार अधिक जवळचा वाटतो. मात्र, याच आईने कठीण काळात मुलांचा हात सोडला तर ते सैरभैर होतात. असाच प्रसंग आलाय एका अल्पवयीन मुलीवर. जन्मदाता देवाघरी गेलेला, जन्म दिलेल्या आईने दुसऱ्याशी संसार थाटलेला अशा स्थितीत आईनेच मुलीचे पालकत्व स्वीकारण्यास नकार दिला. सरतेशेवटी आजी-आजोबांनाच तिचे पालक व्हावे लागले आहे. 

ही कथा आहे एका अल्पवयीन मुलीची. याचिकादार आजी-आजोबांच्या मुलाचा विवाह प्रतिवादीशी (मुलीची आई) २०११ मध्ये झाला. त्यांच्या संसारवेलीवर कन्यारूपी पुष्प उमलले. मात्र, दोघांमधील वाद टोकाला गेला. २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. मुलीच्या दुर्दैवाचे फेरे इथेच संपले नाहीत. जन्मदात्याचा कोरोनामुळे २०२० मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईने पुनर्विवाह केला. तिच्या दुसऱ्या संसारात ती रमली. तिला दोन मुलेही झाली. मुलगा नाही, सुनेने दुसरा मार्ग निवडल्याने आपल्या अल्पवयीन नातीचे पालकत्व मिळावे, यासाठी तिच्या आजी-आजोबांनी उच्च न्यायालयाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. मनीष पितळे यांच्या एकलपीठासमोर झाली. ही याचिका विचित्र परिस्थितीत दाखल झाली आहे, असे म्हणत न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे पालक म्हणून तिच्या आजी-आजोबांची नियुक्ती केली.

आई म्हणाली...दुसऱ्या विवाहापासून दोन मुले झाल्याने आता आपण मुलीची काळजी घेऊ शकत नाही. मुलीच्या आजी-आजोबांना तिचे पालक म्हणून नियुक्त करण्यास आपली काहीच हरकत नाही. मुलीच्या आईने आजी-आजोबांना अल्पवयीन मुलीचे पालकत्व देण्यास ना-हरकत दिल्याने तेच मुलीच्या हिताचे आहे, असे निरीक्षण न्यायालयाने अखेरीस नोंदवले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय