शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रुग्णालयातून पळवलेले अर्भक आईच्या स्वाधीन; खामगाव पोलिसांची कामगीरी, 6 आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 22:19 IST

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपजिल्हा रुग्णालयातून एका बुरखा धारी महिलेने  पळवीलेले अर्भक पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेवून आईच्या स्वाधीन केले.

श्यामकुमार पूरेसिल्लोड: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपजिल्हा रुग्णालयातून एका बुरखा धारी महिलेने  पळवीलेले अर्भक पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेवून  आईच्या स्वाधीन केले.अर्भक पाळविनारी महिला, विकत घेणारे दाम्पत्य चालक सहित खामगाव पोलिसांनी 6 आरोपीना अटक केली आहे.

अर्भक पळवीणाऱ्या त्या बुरखाधारी महिलेचे नाव प्रीती दाविद गायकवाड़, तिचा पति मोहसीन हुसेनखान हे सिल्लोड येथील राहिवाशी असून खामगाव येथे स्थाईक झाले आहे.हे या गुह्यातील मुख्य आरोपी आहे. तर या अर्भकाला विकत घेणारे दाम्पत्य मल्लिका बेगम हिम्मतखां पठाण, फिरदौस असलम आसमानी हे मुळचे औरंगाबाद येथील राहिवाशी असून आता दिल्लीत स्थाईक झाले आहे. तर इंडिका कार चालक राजे जहांगीरखां , साथीदार इरफानखां बशिरखां हे दोन्ही औरंगाबाद येथील राहिवाशी आहे. वरील 6 आरोपिना पोलिसांनी अटक केली आहे.

 खामगाव येथिल शासकीय रुग्णालयातून 5 दिवसांचे बाळ चोरी गेल्याच्या घटनेमुळे मुळे महाराष्ट्रात  खळबळ उडाली  होती.. तर हे नवजात बाळ चोरी होत असतानाच संपूर्ण प्रकार cctv मध्ये कैद झाला होता... यावेळी पोलिसांनी त्वरित अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास चक्रे फिरविली.पोलिसांनी तब्बल 4 ते 5 पथक तयार करून टेक्निकल पद्ध्तीने बाळाचा शोध लावला पोलिसांनी बाळाला आईच्या स्वाधीन केलेय.

अर्भक सिल्लोड मार्गे दिल्लीला-सदर अर्भक खामगाव येथून इंडिका कार एम एच 49 एफ 1597 मधून सिल्लोड व सिल्लोड येथून औरंगाबाद येथे आन ण्यात आले. सदर बाळाची डिलेवरी आधी सिल्लोड व नंतर औरंगाबाद येथे होणार होती. पण पोलिस पाठलाग करीत असल्याची कुनकुन लागल्याने आरोपीनी त्या 5 दिवसाच्या बाळाला औरंगाबाद येथून विमानाने दिल्लीला नेले. व मूल नसलेल्या कोटयाधीश दाम्पत्याला विकले.

35 लाखात विकले होते-सदर दाम्पत्य कोटयाधीश असून त्यांना मूल बाळ होत नसल्याने त्यांनी प्रीती व मोहसीन यांच्याशी 35 लाखात एक सुंदर बाळाचा सौदा केला होता. वरील दाम्पत्याने 7 लाख रुपये अडव्हांन्स दिले होते. पन सीसी टीव्ही फुटेज मुळे महिला व कार नंबर मिळाल्याने आरोपींचा डाव फसला व पोलिसांनी वरील 6 आरोपिना अटक केली.

बाळ आईच्या स्वाधीन-या गुह्याचा तपास करण्यासाठी 5 पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. औरंगाबाद येथून इंडिका कार चालक सहित  पोलिसांनी जप्त केली. त्या नंतर त्या बुरखाधारी महिला व व तिचा पति यांना दौंड येथे अटक केली. नंतर दिल्ली येथून दाम्पत्याला अटक करुण त्या बाळाला मूळ आई सुमैयाबी आसीफ खान रा. खामगाव यांच्या स्वाधीन केले. चार आरोपी खामगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. ते दाम्पत्य दिल्ली येथे असून त्यांना रात्री उशीरा खामगाव येथे आणले जाणार आहे.

12 तास बाळ उपाशी...खामगाव येथून पळविलेले ते बाळ वीमानाने दिल्ली पर्यन्त गेले खरे पण या काळात त्याला साधे दूध पण त्यां बुरखा धारी महिलेने पाजले नाही... पण जिसका मालिक रखवाला उसे मार सखे ना कोई... थेयलित असलेला 5 दिवसाचा तो बाळ ठनठनित आहे. 

यांनी केली कार्यवाही-सदर कार्यवाही  पोलिस अधीक्षक शशी कुमार मिना यांच्या मार्गदर्शन खाली खामगाव पोलिस, बुलढाणा, पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज केदारे,उप निरीक्षक  दिनकर मोरे, इमरान इनामदार, केशव अक्तूरकर, विकास खांनजोडे, केशव नागरे, सैयद हारून, अताउल्ला खान, नंदकिशोर धोड़े, दीपक पवार, रघुनाथ जाधव, पंकज मेहेर,अमोल तरमले, योगेश सरोदे, अमोल अंभोरे, प्रवीण पडोल, संदीप मोरे, गजानन शेळके, विजय मुंढे, नितेश हिवाळे, प्रियंका राठोड यांनी केली.(फोटो)कॅप्शनअपहरण झालेले 5 दिवसाचे बाळ आई सुमैयाबी वडील अतीक खा यांच्या स्वाधीन करतांना पोलिस निरीक्षक मनोज केदारे व पोलिस कर्म चारी दिसत आहे.

आरोपींना पकड़ण्याची  कामगीरी करणारे पोलिस अधीक्षक शशी कुमार मिना यांच्या मार्गदर्शन खाली खामगाव पोलिस, बुलढाणा, पोलिस व गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज केदारे,उप निरीक्षक  दिनकर मोरे, इमरान इनामदार, केशव अक्तूरकर, विकास खांनजोडे दिसत आहे