शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना जाळून आईने स्वत:लाही पेटवले, तिघांचाही मृत्यू; कल्याणच्या वाडेघरमधील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:25 IST

जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे.

कल्याण : जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिता कनोजिया (२९) असे आईचे तर नंदिनी (२) आणि दुर्गेश (९ महिने) अशी मुलांची नावे आहेत. अनिताचे पती अजयकुमार लॉण्ड्रीत कामाला आहेत. शनिवारी सकाळी ते कामावर गेले. त्यानंतर दुपारी घरी जेवून ते पुन्हा कामाला गेले. सायंकाळी त्यांच्या शेजारणीने त्यांच्या घराचे दार ठोठावले. तेव्हा दाराला आतून कडी होती. अनिता आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे शेजारणीला संशय आला. तिने अजयकुमार यांना फोनद्वारे हा प्रकार सांगताच ते तातडीने घरी आले. दार उघडण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. खोलीच्या मागील खिडकीतून त्यांनी पाहिले असताना अनिता व दोन मुले जळलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी दार उघडून तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले आहेत.मुलांवर रॉकेल ओतून त्यांना जाळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मृत अनिताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अजयकुमार हा आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे तिने मुलांना जाळून स्वत:ही आत्महत्या केली असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.आत्महत्येमागील कारण शोधण्याची पतीची मागणीमृत अनिताचा पती अजयकुमार याने सांगितले की, त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक विवंचना नव्हती. तसेच त्यांचा संसार सुखी होता. पत्नी व मुलेही त्यांच्या कामाविषयी समाधानी होते. त्यामुळे पत्नीने मुलांना का जाळले, तसेच तिने का आत्महत्या केली, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून खऱ्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी अजयकुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाMurderखून