शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक खासदार मराठा-कुणबी समाजाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 06:13 IST

सेनेकडून सर्वाधिक मराठा; ब्राह्मण, चर्मकार समाजालाही मोठी संधी

- सुधीर लंकेराज्यातील खासदारांमध्ये मराठा समाजाचा टक्का सर्वाधिक ४३ टक्के आहे. कुणबी खासदारांची संख्या ८ टक्के तर ब्राह्मण व चर्मकार समाजातील खासदारांची संख्या प्रत्येकी ६ टक्के आहे. या चार जातींच्या खासदारांची संख्या ६४ टक्क्यांच्या घरात जाते.

राष्टÑवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असल्याची टीका होते. मात्र, आकडेवारी पाहिली तर गत दोन लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीकडून मराठा समाजाला सर्वाधिक उमेदवारी देण्यात आली. २०१४ मध्ये सेना-भाजपने १८ तर दोन्ही काँग्रेसने १६ मराठा उमेदवार दिले होते. यंदा युतीने २२ तर दोन्ही काँग्रेसने १४ मराठा उमेदवार दिले. पक्षनिहाय विचार करता सेनेने सर्वाधिक १४, राष्टÑवादीने ११, भाजपने ८ तर काँग्रेसने ३ मराठा उमेदवार दिले होते. मराठा समाजाचे २१ (४३ टक्के) उमेदवार निवडून आले आहेत. त्यात सेनेचे १२, भाजपचे ७, तर राष्टÑवादीचे २ खासदार आहेत. २०१४ मध्ये मराठा समाजातील खासदारांची संख्या २० (४१ टक्के) होती. यंदा ती २१ झाली.कुणबी समाजाचे यंदाही चार (८.३३ टक्के) खासदार निवडून आले. कुणबी समाजातून काँग्रेसने ५, राष्टÑवादीने १ तर सेना-भाजपने प्रत्येकी २ उमेदवार दिले होते. त्यापैकी भाजपचे २, तर शिवसेना व काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार झाला. कुणबी समाजानंतर ब्राह्मण समाजाला संधी मिळाली आहे.

अन्य समाजांचा प्रत्येकी एक खासदारलिंगायत, मुस्लिम, गुजराथी, वंजारी, आगरी, सीकेपी, गवळी, लेवा पाटील, माळी, बौद्ध, खाटिक, शेट्टी, तेली या समाजघटकांतून प्रत्येकी एक खासदार संसदेत पोहोचला आहे. आदिवासी समाजातून चार खासदार संसदेत गेले आहेत. या चारपैकी तीन खासदार हे भाजपचे तर एक सेनेचा आहे. धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावरुन आक्रमक आहे. मात्र, या समाजातून प्रमुख राजकीय पक्षांकडून यावेळी एकही उमेदवार नव्हता. 

लोकसंख्येत मराठा समाजाचे प्रमाण अधिक असल्याने सर्वांनी त्यांना उमेदवारीत प्राधान्य दिल्याचे दिसते. वास्तविक ‘इलेक्टिव्ह मेरिट’मुळे अनेक जाती सत्तेपासून वंचित राहतात.- डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य, राज्य मागासवर्ग आयोग