शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

राज्यातील शेतक-यांची सर्वाधिक लूट, पीक विम्याने कंपन्या गब्बर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 04:04 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसणा-या शेतक-यांना आधार देण्यासाठी मोदी सरकारने वाजतगाजत लागू केलेल्या प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत शेतक-यांचे शोषण करून विमा कंपन्या मालामाल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली

हरिश गुप्ता नवी दिल्ली : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसणा-या शेतक-यांना आधार देण्यासाठी मोदी सरकारने वाजतगाजत लागू केलेल्या प्रधानमंत्री कृषी विमा योजनेत शेतक-यांचे शोषण करून विमा कंपन्या मालामाल होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे ही योजना शेतक-यांच्या कल्याणसाठी सुरू केली की विमा कंपन्यांच्या भरभराटीसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.‘लोकमत’कडे उपलब्ध असलेल्या सन २०१६-१७ च्या आकडेवरीनुसार, त्या वर्षात शेतक-यांनी, २७ राज्यांच्या सरकारांनी आणि केंद्र सरकारने मिळून विमा हप्त्यापोटी विमा कंपन्यांना एकूण २२,१६६.८२ कोटी रुपये एवढी रक्कम अदा केली. याच्या बदल्यात नुकसान झालेल्या शेतकºयांच्या वाट्याला जेमतेम निम्मी रक्कम आली. शेतक-यांना फक्त १२,३९७.९५ कोटी रुपये रक्कम भरपाईच्या दाव्यांपोटी दिली गेली. बाकीची ९,७६८.८७ कोटी रुपयांची रक्कम नफा म्हणून विमा कंपन्यांच्या घशात गेली.‘प्रधानमंत्री फसल बिमा योजना’ (पीएमएफबीवाय) व ‘हवामानावर आधारित पुनर्रचित पिक विमा योजना (आरडब्ल्यूबीसीआयएस) या २ योजनांतर्गत २७ राज्यातील १.२० कोटी शेतक-यांनी त्या वर्षी पीक विमा उतरविला होता. आकडेवारी पाहता, प्रत्येक शेतकºयाला विमा दाव्यापोटी ११ हजार रुपये मिळाले. या पीक विमा योजनांचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील शेतक-यांना बसला. राज्यातील शेतकºयांनी हप्त्यापोटी ४,७२९.२४ कोटी रुपये कंपन्यांना दिले तर नुकसानीच्या दाव्यांपोटी फक्त २,२९५.३३ कोटी मिळाले. ही रक्कम महाराष्ट्रातील २९.१९ लाख शेतक-यांना देण्यात आली. म्हणजेच एकट्या महाराष्ट्रातून कंपन्यांना दुप्पट नफा झाला आहे. देशातील २७ राज्यात महाराष्ट्राने सर्वाधिक प्रीमियम जमा केला आहे. त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि बिहारचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात बहुतांश भागात २०१५-१६ मध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती होती, तरीही राज्यातील शेतकºयांना इतरांच्या तुलनेत कमी भरपाई मिळावी, हे जखमेवर आणखी मीठ चोळणारे होते.तामिळनाडू हे एकमेव असे राज्य आहे, जिथे विमा कंपन्यांना प्राप्त प्रीमियमच्या तुलनेत अधिक रकमेचे दावे द्यावे लागले आहेत. तामिळनाडूने १,२३६.७० कोटींचा प्रीमियम जमा केला, तर २,५२९.४६ कोटी रुपये ८ लाख ५७ हजार ८४८ शेतक-यांना दाव्यापोटी दिले. मात्र, ही परिस्थिती अन्य राज्यात पहायला मिळाली नाही.गोव्यात या कंपन्यांना ७ कोटी रुपयांचा प्रीमियम देण्यात आला, पण कंपन्यांनी फक्त १११ शेतक-यांना ३ कोटी रुपयांचे दावे दिले आहेत. हिमाचल प्रदेशातील परिस्थितीही अतिशय खराब आहे. येथे ७१ कोटींच्या प्रीमियमच्या तुलनेत २०.२८ कोटी रुपये शेतकºयांना देण्यात आले आहेत. झारखंडमध्ये कंपन्यांना २७१.९६ कोटी रुपये प्राप्त झाले आणि २०.२८ कोटी रुपयांचे दावे दिले.आश्चर्याची बाब म्हणजे, कंपन्यांनी विम्याच्या हप्त्यामध्ये तीन पट वाढ करण्याची मागणी केली आहे. कारण दाव्यांमध्ये २००% वाढ झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २०१६ मध्ये शेतक-यांनी ४,३७४ कोटी रुपयांचे विम्याचे प्रीमियम भरले, तर २७ राज्य व केंद्र सरकारने १७,७९२ कोटी रुपये भरले.कंपन्यांना हवा वाढीव हप्ता-मोदी सरकारची अशी इच्छा आहे की, पीक विम्याचे क्षेत्र सद्याच्या ३० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर जावे. हे दावे त्वरित दिले जावेत, यासाठी दिशानिर्देशात दुरुस्तीचाही विचार कृषी मंत्रालय करत आहे.या संबंधीचे सर्व मुद्दे सोडविण्यासाठी सरकार २० व्यावसायिकांना कामावर ठेवण्याची योजना आखत आहे. मोदी सरकारने ‘पीक विमा योजने’चे नाव बदलत ‘हवामानावर आधारित पीक विमा योजना’ असे नवे नाव या योजनेला दिले आहे. मात्र, नाव बदलल्याने हे व्यस्त गणित कसे सुटणार, हा प्रश्न आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी