शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन पोलिस खात्यात; वर्षभरात दीड हजार तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 08:55 IST

आयोगाचा राज्याला अहवाल

अविनाश साबापुरेयवतमाळ : सततच्या जनजागृतीमुळे मानवी हक्कांबाबत आता प्रत्येकजण संवेदनशील झाला आहे. त्यातूनच मानवी हक्क आयोगाकडे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. केवळ एका वर्षात तब्बल ३ हजार ७६३ तक्रारी दाखल झाल्याचा अहवाल आयोगाने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यातील दीड हजारांवर तक्रारी एकट्या पोलिस खात्याविरुद्ध आहेत, हे विशेष.

राज्य मानवी हक्क आयोगाने २०२०-२१ या वर्षातील कामांचा अहवाल नुकताच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२० या एका वर्षभरात आलेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक १५५८ तक्रारी या पोलिसांबद्दल आहेत. विविध तुरुंगातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्याही ३३२ तक्रारी आयोगाकडे आल्या. गंभीर म्हणजे या तक्रारींपैकी आयोगाला केवळ १ हजार ८३ तक्रारींचाच वर्षभरात निपटारा करता आलेला आहे. यामागे मानवी हक्क आयोगाला शासनाकडून मिळणारे अल्प अनुदान आणि पायाभूत सुविधांची मर्यादा कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सईद आणि सचिव तुकाराम मुंढे यांनी अहवालाच्या प्रास्ताविकातच ही अडचण नमूद केली आहे.

२० हजार खटले प्रलंबितराज्य मानवी हक्क आयोगाने एका वर्षात केवळ १ हजार ८३ खटले निकाली काढले. मात्र, अद्यापही आयोगापुढे तब्बल २० हजार ७३७ खटले प्रलंबित आहेत. २०१९ या वर्षातील १८ हजार ५७ खटले आधीच प्रलंबित असताना २०२० या वर्षात आणखी ३ हजार ७६३ तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या. एकंदर २१ हजार ८२० तक्रारींपैकी केवळ हजार तक्रारीच २०२० मध्ये निकाली निघू शकल्या.