शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिला उमेदवारांना अधिक वाव

By admin | Updated: October 31, 2016 01:54 IST

‘डी’ वॉर्डलाही प्रभाग फेररचनेमुळे मोठा फटका बसला आहे.

मुंबई : ‘डी’ वॉर्डलाही प्रभाग फेररचनेमुळे मोठा फटका बसला आहे. या वॉर्डमधील प्रस्थापित नगरसेवकांचे प्रभागच आरक्षित झाल्याने त्यांनी आजूबाजूच्या प्रभागांकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे पक्षासाठी सच्चेपणाने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. प्रभाग फेररचनेत या वॉर्डातील सहा प्रभागांपैकी चार प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. त्यामुळे महिला उमेदवारांना या निवडणुकीत अधिक वाव मिळणार आहे. या वॉर्डातून मेट्रो तीन जाणार असल्याने हा मुद्दादेखील निवडणुकीचा महत्त्वाचा ठरणार आहे. फेररचनेमुळे इतर प्रभागांमध्ये होणाऱ्या घुसखोरींमुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे आव्हान विविध पक्षांपुढे निर्माण झाले आहे. पालिकेच्या ‘ए’ (कुलाबा), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), ‘डी’ (ग्रँटरोड), ‘ई’ (भायखळा) या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील प्रत्येकी एक, तर जी-दक्षिण (प्रभादेवी) मध्ये दोन प्रभाग असे एकूण सात प्रभाग कमी झाले आहेत. त्यामुळे शहरांतील नगरसेवकांची संख्या घटली आहे. (प्रतिनिधी)२०१२ सालच्या महानगरपालिका निवडणुकीत ‘डी’ विभागात केवळ दोन प्रभाग महिला आरक्षित होते. मात्र यंदा वॉर्डमध्ये मुखत्त्वे: महिला आरक्षण असल्याने इच्छुक महिला उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही इच्छुक महिला उमेदवारांनी स्थानिक विभागात विविध पद्धतीने मतदारांचे मन जिंकण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीत ‘डी’ वॉर्डमध्ये शिवसेनेला बहुमत प्राप्त झाले होते. त्यांचे एकूण तीन नगरसेवक होते. दोन काँग्रेस आणि दोन भाजपाचे नगरसेवक होते. आता सेनेला या ठिकाणी आपले वर्चस्व टिकवून सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. >‘मेट्रो’चा मुद्दा ठरणार महत्त्वाचामेट्रो तीनचा मार्ग डी वॉर्डमधून जात असल्याने येथील स्थानिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी काळात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर हा प्रश्न असेल. त्यामुळे मतदारांचा अधिकाधिक पाठिंबा मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. >प्रभाग क्रमांक २१४आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ६०२३६अनुसूचित जाती - १८३९अनुसूचित जमाती - २१७प्रभागाची व्याप्ती : गोवालिया टँक, जनता नगर, महालक्ष्मी मंदिर, जसलोक रुग्णालय, ताडदेव>प्रभाग क्रमांक २१७आरक्षण - इतर मागासवर्गीयएकूण लोकसंख्या - ५७३८५अनुसूचित जाती - १२३१अनुसूचित जमाती १४९प्रभागाची व्याप्ती : पपनसवाडी, शापुरबाग, आॅगस्ट क्रांती मैदान, गावदेवी, गिरगाव चौपाटी>प्रभाग क्रमांक २१५आरक्षण - खुला (महिला)एकूण लोकसंख्या - ५३०८४अनुसूचित जाती - ८९७९अनुसूचित जमाती- ३८२प्रभागाची व्याप्ती : वेलिंग्टन स्पोर्ट्स क्लब, आर.टी.ओ, चिखलवाडी, भाटिया रुग्णालय, तुळशीवाडी, बने कंपाऊंड, तालमीकी वाडी>प्रभाग क्रमांक २१६आरक्षण - खुला (महिला)एकूण लोकसंख्या- ५९२६५अनुसूचित जाती - ३६२८अनुसूचित जमाती- ७७प्रभागाची व्याप्ती : नवजीवन सोसायटी, बीआयटी चाळ, दलाल इस्टेट>प्रभाग क्रमांक २१८आरक्षण- इतर मागासवर्गीय महिलाएकूण लोकसंख्या- ५६९९३अनुसूचित जाती- ४१९अनुसूचित जमाती - ४४७प्रभागाची व्याप्ती : सिक्कानगर, मंगलवाडी, क्रांतीनगर, आॅपेरा हाऊस, मफतलाल जलतरण तलाव, चौपाटी, गायवाडी> प्रभाग क्रमांक २१९आरक्षण -इतर मागासवर्गीय महिलाएकूण लोकसंख्या- ५९९०३अनुसूचित जाती - ७४८अनुसूचित जमाती- ३५७प्रभागाची व्याप्ती : सिमलानगर, हैदराबाद इस्टेट, कमला नेहरु पार्क, राजभवन, तीनबत्ती, मलबार हिल>२०१२ साली डी वॉर्डातील विजयी आणि पराभूत उमेदवार>वॉर्डविजयी उमेदवार प्राप्त मतेपराभूत उमेदवार प्राप्त मते२१०नोशीर रुसी मेहता, काँग्रेस१२,०३०अनिल नागरे, मनसे२४०६२११अरविंद दुधवडकर, सेना९००४प्रमोद मांद्रेकर, काँग्रेस ६७२५२१२सरिता पाटील, भाजपा ९७७१उज्ज्वला बने,अपक्ष८८७१२१३अनिल सिंग, सेना३६४८किसन जाधव, काँग्रेस२९५३२१४ज्योत्स्ना मेहता, भाजपा८३५४सुशीबेन शहा, काँग्रेस५२८२२१५सुरेंद्र बागलकर, सेना१३,७५७श्रीधर जगताप,मनसे ५३३४२१६शांतीलाल दोषी, काँग्रेस५६६०संजीव पटेल,बसपा४२०९