शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

राज्यातील शंभरपेक्षा अधिक सूतगिरण्यांना आर्थिक घरघर

By राजाराम लोंढे | Updated: August 6, 2022 08:50 IST

कापूस मिळेना, चक्र फिरेना : उत्पादन कमी असताना निर्यात आली मुळावर

- राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील कापसाचे घटलेले उत्पादन, केंद्र सरकारचे चुकीचे आयात-निर्यात धोरणामुळे निर्माण झालेली टंचाई, कापसाला आलेला सोन्याचा भाव आणि महागडा कापूस वापरून तयार केलेल्या सूताला कोणी विचारत नसल्याने राज्यातील शंभरहून अधिक सूतगिरण्याच अरिष्टात सापडलेल्या आहेत. अनेकांचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उत्पादन बंद आहे, तर काहींनी ३० टक्के क्षमतेनेच उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

देशाच्या औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के हिस्सा वस्त्रोद्योगाचा आहे. राज्याच्या उत्पन्नातही वस्त्रोद्योगाचा खूप मोठा वाटा आहे. सूतगिरण्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबे उभी राहिली आहेत. राज्यात ‘इचलकरंजी’, ‘भिवंडी’, ‘मालेगाव’ आदी शहरांत सूतगिरण्या तुलनेत अधिक आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना आर्थिक ग्रहण लागले. टंचाईमुळे कापसाच्या दरात भरमसाठ वाढ होत गेली. साधारणता ६८ हजार रुपये खंडी (३५५.६२ किलो) दर होता, मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांत तो १ लाख १५ हजारांपर्यंत पोहोचला होता. एकतर कापूस मिळेना, जादा दराने खरेदी केला तर सूताला अपेक्षित भाव मिळेना, अशा कात्रीत सूतगिरण्यांचे व्यवस्थापन अडकले आहे. मिल बंद असल्या तरी वीजबिल व कामगार पगाराचा महिन्याला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.

देशातील कापसाचे उत्पादन आणि मागणी याचा ठोकताळा घालून आयात-निर्यातीचे धोरण अवलंबवा लागते, मात्र केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ पासूनच कापसाची निर्यात सुरू ठेवली. हीच निर्यात वस्त्रोद्याेगाच्या मुळावर आली आहे. त्यात ज्यांच्यावर कापूस खरेदीची जबाबदारी असते, त्या कॉटन कॉर्पेारेशन इंडिया कंपनीने यंदा खरेदीकडे काहीसा कानाडोळा केल्याचा फटकाही बसला आहे. दिवाळीला नवीन कापसाचे उत्पादन होणार असले तरी गेल्या वर्षीप्रमाणे परतीच्या पावसाने झोडपले तर अडचणीत अधिक भर पडणार हे निश्चित आहे.

देशातील निम्या गिरण्या तामिळनाडूतदेशात १४१३ सूतगिरण्या असून, त्यापैकी जवळपास १७१ बंद आहेत. सर्वाधिक म्हणजे ७७० गिरण्या एकट्या तामिळनाडूमध्ये आहेत. त्यापाठोपाठ १४५ आंध्र प्रदेश व तेलंगणात आहेत.किलोमागे ५० रुपयांचा तोटासाधारणत: १०० किलो कापसामधून २५ ते ३० किलो घाण जाते. त्यामुळे जरी २४७ रुपये किलोने खरेदी केला तरी तो ३२० रुपयांपर्यंत दर जातो. त्यापासून तयार केलेल्या सूताचा उत्पादन खर्च ४९० रुपये किलोपर्यंत जातो. मात्र प्रत्यक्षात सूताला मिळणारा भाव बघितला तर किलोमागे ५० रुपये तोटा होत आहे.आगाऊ पेमेंटशिवाय कापूस मिळेनासगळीकडेच कापूस टंचाई असल्याने व्यापाऱ्यांनीही ताठर भूमिका घेतली आहे. आगाऊ पेमेंट घेऊनच कापसाची गाडी सोडले जाते. साधारणता कापसाची एक गाडी खरेदी करायची म्हटली तर ४५ लाख रुपये लागत असल्याने सूतगिरण्यांचे व्यवस्थापन पुरते हतबल झाले आहे.

कापूस दरवाढीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कामगारांना निम्मे पगार देऊन मिल बंद ठेवाव्या लागत आहेत. केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने नाही पाहिले तर हा उद्योग संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.- युवराज घाटगे, कार्यकारी संचालक, महेश को-ऑप. स्पिनिंग मिल, तारदाळ

वस्त्रोद्योग महामंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत केलेल्या कापूस खरेदीवर १० टक्के नुकसानभरपाईची मागणी करणार आहोत.- अशोक स्वामी, माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग महामंडळ