शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांत १५ हजारांहून अधिक बालविवाह; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 09:46 IST

आदिवासी भागात कुपोषणासाठी बालविवाहच मुख्य कारण आहे, असे मतही महाधिवक्ता यांनी व्यक्त केले

मुंबई : राज्यातील १६ आदिवासी भागात गेल्या तीन वर्षांत १५ हजारांहून अधिक बालविवाह झाले व १५०० च्या आसपास बालविवाह रोखण्यात सरकारला यश मिळाले, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. कुपोषणाचे मुख्य कारण बालविवाह असावे, असे मत गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने व्यक्त करत गेल्या तीन वर्षांत राज्यातील आदिवासी भागात किती बालविवाह झाले, याचे सर्वेक्षण करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले होते.

मुख्य सचिव व महाअधिवक्त्यांनी सर्वेक्षणासाठी तीन सदस्यांची समिती नेमली. तीन वर्षांतील अतिकुपोषित, मध्यम कुपोषित व कुपोषणामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी सर्वेक्षणातील अहवालात नमूद करण्यात आली. तसेच त्या मुलांच्या आईचा विवाह कधी झाला, याचीही चौकशी करण्यात आली व प्रत्येक जिल्ह्यात २०१९ -२०, २०२०-२१, २०२१-२२ या तीन वर्षांत किती बालविवाह झाले, याचीही आकडेवारीही तपासण्यात आली.

ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, जळगाव, अहमदनगर, नाशिक, नांदेड, चंद्रपूर यासह १६ आदिवासी भागात १५ हजारांहून अधिक बालविवाह झाले व बालविवाह रोखणाऱ्या समितीने  १५०० च्या आसपास बालविवाह रोखल्याची माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली. आदिवासी भागात कुपोषणासाठी बालविवाहच मुख्य कारण आहे, असे मतही महाधिवक्ता यांनी व्यक्त केले.सर्वेक्षण अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत राज्यातील १६ भागात २६ हजार ०५९ अतिकुपोषित बालके आहेत. १ लाख१० हजार ६७४ बालके मध्यम कुपोषित आहेत, तर कुपोषणामुळे ६ हजार ५८२ बालकांचा मृत्यू झाला. राज्यातील १६ आदिवासी भागात १५ हजार २५३ बालविवाह झाले. कुपोषणास व कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूस  मुलींचा बालविवाह मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला आहे, अशी माहिती कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय