शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

राज्यात एक लाखाहून अधिक सिझेरियन प्रसूती; तीन महिन्यांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:45 IST

नैसर्गिक कारणांसह न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही घेतला जातो निर्णय

- स्नेहा मोरे मुंबई : मागील काही वर्षांत राज्यात ‘^सिझेरियन’ (सी-सेक्शन) प्रसूतींच्या संख्येत वाढ झालेली बघायला मिळत असून यंदा एप्रिल ते जून या काळात एकूण प्रसूतींपैकी २२.६ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या आहेत. लग्नाचे सर्वसाधारण वय वाढल्यामुळे जोडप्यांनी बाळासाठी उशिरा प्रयत्न सुरू करणे, तसेच जीवनशैलीतील बदलांच्या विपरीत परिणामांमुळे प्रसूतीत अडचणी संभवणे ही याची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. परंतु याबरोबरच न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही प्रसूतीबाबत कोणताही धोका न पत्करण्याकडे डॉक्टरांचा कल असल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१८-१९ मध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण एकूण ९४ हजार ८६३ इतके होते. मात्र एप्रिल ते जून या कालावधीत राज्यात सरकारी रुग्णालयांमध्ये ४२ हजार ८९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५७ हजार ५६७ इतक्या सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. तीन महिन्यांत राज्यात अशा प्रकारे १ लाख ४६१ प्रसूती झाल्या. राज्यात पुण्यात सर्वाधिक १२ हजार ४३ सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. त्यात सरकारी रुग्णालयात ४४६७ आणि खासगी रुग्णालयांत ७५७६ प्रसूती झाल्या. त्याखालोखाल मुंबईत १०,९१४ सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या. यात सरकारी रुग्णालयांत ४९२९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५९८५ असे प्रमाण आहे.दहा वर्षांपूर्वी सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण सर्वसाधारणपणे २० टक्के होते, ते आता ३५ टक्के झाल्याचे ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. प्रशांत सरेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अधिक वयातील प्रसूतींचे प्रमाण आता वाढले आहे. वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्यांमध्येही वाढ होत असून त्यांच्या बाबतीत प्रसूतीबद्दल अधिक धोका पत्करला जात नाही. जोडप्यांना हल्ली सहसा एक किंवा दोनच मुले असल्यामुळे त्या बाळांच्या वेळी धोका नको असा जोडप्यांचाही कल असतो. पूर्वी गरोदरपणात मधुमेहासारखे आजार असण्याचे प्रमाण कमी दिसायचे. आता तेही वाढले असून अशा महिलांच्या बाबतीतही प्रसूतीत धोका पत्करला जात नाही. याशिवाय न्यायवैद्यकीय खटला संभवण्याच्या दबावामुळेही काही वेळा डॉक्टरांकडून सिझेरियन प्रसूती करण्याकडे कल राहतो.ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शहनाज तारवाला यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, विविध वैद्यकीय तपासण्या उपलब्ध झाल्यामुळे बाळ नैसर्गिक प्रसूतीचा ताण सहन करू शकेल का, अशा गोष्टींची कल्पना आधी येऊ शकते. प्रसूती सिझेरियन करण्यामागे काही कारणे बाळासाठीची तर काही आईसाठीची असतात. शिवाय बाळाच्या आरोग्यास धोका असल्याचे तपासण्यांवरून लक्षात आल्यास धोका पत्करला जात नाही. अशा वेळी न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही डॉक्टरांकडून सिझेरियनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.घरगुती प्रसूतींचे प्रमाण कमीराज्यात २०१८-१९ या वर्षात एप्रिलते जून या कालावधीत ३,५३०घरगुती प्रसूती झाल्या होत्या.यंदा मात्र मागील तीन महिन्यांत राज्यात २,७७३ घरगुती प्रसूती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती प्रसूती झाल्या असून त्यांची संख्या यंदा १,१९१ असून गेल्या वर्षी ती १३४१ इतकी होती.‘आॅन डिमांड’ प्रसूतीकाही दाम्पत्य मुहूर्त पाहून, तसेच आपल्या सोयीनेही प्रसूतीचा निर्णय घेताना दिसतात. परदेशात ‘आॅन डिमांड’ प्रसूतीचे प्रमाण ५ टक्के, तर आपल्याकडे ते १ ते २ टक्के असल्याचे डॉ. तारवाला यांनी सांगितले.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी