शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

मुली हरवण्याचे प्रमाण अधिक

By admin | Updated: November 19, 2014 05:05 IST

सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात चालू वर्षात १४ ते १८ या वयोगटातील हरवलेल्या आणि पळवलेल्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली

ठाणे : सांस्कृतिक शहर असलेल्या ठाण्यात चालू वर्षात १४ ते १८ या वयोगटातील हरवलेल्या आणि पळवलेल्या मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यांत २३४ मुले व ४७३ मुली हरवल्या. ५१ मुलींना पळवण्यात आले आहे. दुसरीकडे ० ते ७ आणि ७ ते १४ या वयोगटात ४१ मुले हरवलेली असून, ८३ मुलींना पळवण्यात आले आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा पहिल्या १० महिन्यांत एकूण ७८२ लहान मुले हरवली. त्यामध्ये ५०७ मुली व २७५ मुलांचा समावेश आहे. हरवलेल्यांपैकी ५३५ बालकांचा शोध लागला आहे. अजूनही २४७ मुले-मुली बेपत्ता आहेत. वयोगटानुसार विचार केल्यास १४ ते १८ या वयोगटातील मुले आणि मुलींचे हरवण्याचे प्रमाण हे ० ते ७ आणि ७ ते १४ या वयोगटातील मुलांपेक्षा अधिक आहे. १४ ते १८ या वयोगटात ४७३ मुली तर २३४ मुले हरवल्याची नोंद आहे. त्याप्रमाणे मुली सापडण्याचेही प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये ३२२ मुली तर १६१ मुलांचा समावेश आहे. १५१ मुली आणि ७३ मुले अद्यापही गायब आहेत. ० ते ७ आणि ७ ते १४ वर्षांखालील गटात ४१ मुले तर ३४ मुली हरवलेल्या आहेत. त्यात ० ते ७ मध्ये २४ मुले तर ७ ते १४ वयोगटात २७ मुली हरवल्या आहेत. २४ मुलांपैकी ६ मुले तर २७ मुलींपैकी ५ मुली अद्यापही गायब झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.दुसरीकडे २०२ मुले-मुलींचे अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल झाले असून १०९ गुन्हे उघडकीस आले आहेत. तर एकूण ९३ अपहरण झालेल्या मुलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. ७ ते १४ या वयोगटातील १२२ मुला-मुलींचे अपहरण झाले असून, ६४ जण अद्यापही सापडलेले नाहीत. १४ ते १८ या वयोगटात ५९ मुला-मुलींचे अपहरण झाले आहे. त्यापैकी २१ मुला-मुलींचा अद्यापही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. बेपत्ता होण्यामागची कारणेघरघुती भांडणे, प्रेमप्रकरण, मानसिक संतुलन बिघडणे अशी अनेक कारणे व्यक्तींच्या बेपत्ता होण्यामागे असतात. मात्र मुले बेपत्ता होतात तेव्हा घरच्यांच्या धाकामुळे पळून जाणे, अपहरण होणे ही कारणे असल्याचे आढळून येते, अशी माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)