शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्रसिंह तावडेविरोधात आणखी पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:50 IST

नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात नवीन पुरावे सापडल्याचा दावा राज्य सरकारनेउच्च न्यायालयात गुरुवारी केला. आरोपीविरोधात नवीन पुरावे सापडले असून, पुढील कायदेशीर कारवाई ठरविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडून सूचना घेणे आवश्यक आहे, असे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले.नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे. सरकारची याचिका फेटाळण्यास योग्य आहे. कोणतेही नवीन पुरावे सापडलेले नाहीत. त्यांना जर नवीन पुरावे सापडले असतील तर त्यांनी ही याचिका मागे घ्यावी, असा युक्तिवाद इचलकरंजीकर यांनी केला.न्यायालयाने सरकारी वकिलांना तीन आठवड्यांची मुदत देत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे पानसरे यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्याच महिन्यात कोल्हापूर न्यायालयाने तावडेसह दहाजणांवर आरोप निश्चित केले. सत्र न्यायालयाने तावडे याची जामिनावर सुटका केली. मात्र, या सुटकेचा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार