शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काेराेनावर बऱ्यापैकी नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:25 IST

CoronaVirus News: प्रशासनाच्या प्रयत्नांना यश : कार्यक्रमांना बंदी घालण्यासह नियमांचे काटेकाेर पालन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगभरात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले असून, आता दिल्लीमध्येदेखील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मात्र त्या तुलनेत मुंबईत बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले असून, याचे सारे श्रेय येथील महापालिका आणि सरकारला आहे. कारण उत्सव असो किंवा कार्यक्रम. या सर्वांवर बंदी घालण्यासह नियम अधिकाधिक कठोर केल्याने, चाचण्या वाढविल्याने आणि सुरक्षितता बाळगल्याने दिल्लीच्या तुलनेत मुंबई कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवित असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी आणि छठपूजासारख्या महोत्सवांबाबत सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोरोना काळात लॉकडाऊन कायम ठेवण्यात महाराष्ट्र सरकार ठाम राहिले. शाळा, मंदिर स्थळे, मॉल, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि लोकल पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली नाही. त्याऐवजी लॉकडाऊनची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. गणेशोत्सवावेळी मुंबईने संयम दाखविला.

सामुदायिक दिवाळी साजरा करण्यासही बंदी घातली गेली. दिल्ली सरकारनेही वेळोवेळी अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या. मात्र त्याच वेळी, त्यांनी लॉकडाऊन विश्रांती आणली. बाजारपेठा खुल्या केल्या. दारूच्या दुकानांवरचे निर्बंध हटविले. परिणामी, कोरोना नियमांचा फज्जा उडाला. मुंबईत मात्र नियम पाळले गेले. मुंबईत लोकांना घरामध्येच राहण्यास सांगण्यात आले. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत, अशी बंधने घालण्यात आली. मास्क अनिवार्य करण्यात आले. नियम मोडणाऱ्यांना दंड आकारण्यात आला.

याचा सकारात्मक परिणामn कोरोनावाढीचा दर तसेच मृत्युदर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून, डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. n सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, अशा सूचना राज्याने महापालिकेला दिल्या आहेत. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत काेराेना बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्ली