शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील चार जिल्ह्यांत ३ टक्क्यांहून अधिक मृत्युदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 07:05 IST

मागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  देशपातळीवर कोरोना मृत्युदरांत गेल्या तीन महिन्यांत घट झाली आहे, हे प्रमाण १.५५ टक्क्यांहून १.४५ टक्के झाले आहे. सध्या मुंबईचा कोरोना मृत्युदर ३.८ टक्के आहे, राज्याचा मृत्युदर २.५५ टक्के आहे. मात्र अजूनही राज्याच्या चार जिल्ह्यांत कोरोना मृत्युदर हा ३ टक्क्यांहून अधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे.राष्ट्रीय पातळीवरील मृत्युदराचे विश्लेषण पाहता तीन महिन्यांत हे प्रमाण कमी झाले आहे. सध्या सर्वाधिक मृत्युदर गुजरातमध्ये असून तीव्र संक्रमण काळात हा मृत्युदर २.४४ टक्क्यांहून १.७४ टक्के झाला आहे.

६ ऑक्टोबर रोजी राज्याचा मृत्युदर २.६४ टक्के होता, आता ६ जानेवारी रोजी हा मृत्युदर २.५५ टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे, या कालावधीत पॉझिटिव्हीटी दरही २०.२४ टक्क्यांहून १४.८८ टक्के झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याच्या दरातही वाढ होऊन याचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांहून ९४.७९ टक्के झाला आहे.राज्यात मुंबईचा मृत्युदर सर्वाधिक असून याचे प्रमाण ३.८ टक्के आहे. त्यानंतर परभणी ३.७ टक्के, सांगली ३.५ टक्के, रत्नागिरी ३.४ टक्के मृत्युदर असल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे. 

याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, ज्या जिल्ह्यांमध्ये मृत्युदर अधिक आहे, त्या जिल्ह्यांचे साप्ताहिक स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे. त्यामुळे यंत्रणांकडून मृत्युदर कमी करण्यासाठी लवकर निदान, उपचार करण्यात येत आहेत.

राज्यात कोरोना चाचण्यांत २३ टक्क्यांनी घटमागील दोन महिन्यांत राज्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. राज्याच्या आऱोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३६ लाख ८२ हजार ४६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या काळात ४७ लाख ५५ हजार ८३१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. या कालावधीत दैनंदिन कोरोना चाचण्यांमध्येही घट झाली असून हे प्रमाण ७९ हजारांवरून ६१ हजारांवर आल्याचे दिसून आले. राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने परिणामी चाचण्याही कमी झाल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या