शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

सराईत घरफोड्यांकडून आणखी 16 लाखांचा ऐवज जप्त

By admin | Updated: July 15, 2016 20:09 IST

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलेल्या शिकलगर टोळीकडून आणखी 14 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 15 - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलेल्या शिकलगर टोळीकडून आणखी 14 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून पोलिसांनी आणखी 15 लाख 92 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. त्यामध्ये परकीय चलनाचा समावेश आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.अर्जुनसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय 21), गोरखसिंग गागासिंग टाक (वय 26), लख्खनसिंग रजपूतसिंग दुधाणी (वय 26, तिघे रा. रामटेकडी) आणि किसमतसिंग रामसिंग भादा (वय 31, मुळ रा. बाबानगर, धुळे. सध्या रा. रामटेकडी) अशी आरोपींची नावेआहेत. त्यांचा साथीदार विकीसिंग कल्याणी फरार आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे कर्मचारी प्रमोद गायकवाड यांना खब-याने दिलेल्या माहितीवरुन अतिरीक्त आयुक्त सी.एच. वाकडे, उपायुक्त पी.आर. पाटील, सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्यामार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करीत आरोपींना 7 जुलै रोजी जेरबंद केले होते.न्यायालयामधून आरोपींची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात येत होता. स्वारगेट, खडक, मार्केटयार्ड, विश्रांतवाडी, कोरेगांव पार्क, येरवडा आणि अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी 14 ठिकाणी घरफोडया करून 42 तोळे वजनाचे सोन्याचेदागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, 10 हजार रुपए, 100 अमेरिकन डॉलर्स, 600 ईरो, न्युझीलंडचे 35 डॉलर, अरब देशाचे 165 दिनार, सिंगापूरचे 55 डॉलर्स असा एकुण 15 लाख 92 हजार रूपयाचा ऐवज चोरून नेल्याचे निष्पन्न झाले होते. हा ऐवजहस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी अर्जुनसिंगवर तब्बल 30 गुन्हे दाखल आहेत.-------------स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत महर्षीनगरमधील अंकुर पार्क सोसायटीमध्ये दोन आठवडयापुर्वी झालेली घरफोडी देखील आरोपींकडून उघडकीस आली आहे. आरोपींकडून यापुर्वी दोन चारचाकी वाहने आणि घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.