शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

राज्यात १० कोटी टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन

By admin | Updated: June 4, 2015 23:20 IST

साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे.

राजीव लोहकरे - अकलूजमहाराष्ट्रातील ९९ सहकारी व ७९ खासगी अशा १७८ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये ९ कोटी २९ लाख ८४ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० कोटी ४ लाख ८० हजार मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.२७ असून गतवर्षाच्या तुलनेत ०.१३ टक्के साखर उतारा कमी असल्याची माहिती राज्य साखर संघाचे अध्यक्ष खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये ३७ कारखान्यांनी २१२.५५ लाख मे. टन उसाचे गाळप करून २६.८५ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा सरासरी १२.५६ इतका आहे. हा साखर उतारा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त आहे. या विभागातील सर्व कारखान्यांचा हंगाम संपला आहे. पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ६० कारखान्यांनी ३८६.६७ लाख मे. टन उसाचे गाळप करून ४२.८० लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागातून सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. ६ कारखाने अद्याप गाळप करत आहेत.अहमदनगर विभागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात २३ कारखान्यांनी १३०.00 लाख मे. टन उसाचे गाळप करून १४.३८ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी ११.0७ टक्के साखर उतारा मिळाला आहे. नांदेड विभागातील नांदेड, परभणी, हिंंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी ११६.0८ लाख मे. टन उसाचे गाळप करून १२.३९ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.३७ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातील १ सहकारी व १ खासगी अशा २ साखर कारखान्यांनी ४.८६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५० लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के मिळाला आहे. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्यांतील ४ खासगी साखर कारखान्यांनी ५.४६ लाख मे. टन उसाचे गाळप करून 0.५६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांना १०.२७ टक्के सरासरी साखर उतारा मिळाला आहे.गत हंगामापेक्षा या हंगामामध्ये २५३.५० लाख मे. टन अतिरिक्त उसाचे गाळप होऊन २७.७० लाख मे. टन जास्तीची साखर उत्पादित झाली आहे.औरंगाबाद विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील २२ साखर कारखान्यांनी ७४.२२ लाख मे. टन उसाचे गाळप करून ७.५२ लाख मे. टन साखरेचे उत्पादन मिळवले आहे. त्यांना सरासरी १०.१३ टक्के साखर उतारा मिळाला आहे.