शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

तपासणीच्या नावाखाली १०० पेक्षा अधिक चिनी कंटेनर जेएनपीटी बंदरात अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 02:45 IST

चौकशी सुरू; आयातीत दिलेली माहिती, प्रत्यक्ष आलेल्या वस्तू एकच आहेत का, याची पाहणी

मुंबई : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनमधून मुंबईत विविध वस्तू घेऊन आलेले शेकडो कंटेनर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात विविध तपासणींमध्ये अडकले आहेत. या कंटेनरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाइल्स, मोबाइल अ‍ॅक्सेसरिज, मशिनरी, कच्चा माल यांचा समावेश आहे.

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर जेएनपीटी बंदरात येणाऱ्या कंटेनरमध्ये चीनमधून आलेल्या आयातीचा माल तपासणीसाठी अडवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सध्या चीनमधून आलेले शंभरपेक्षा अधिक कंटेनर विविध तपासणीच्या नावावर बंदरात अडकविण्यात आले आहेत. या कंटेनरच्या आयातीमध्ये दिलेली माहिती व प्रत्यक्षात आलेल्या वस्तू या एकच आहेत का, हे सध्या तपासले जात आहे.भारतात चीनमधून येणाºया आयातीचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत मोठे आहे. चीनमधून मोठ्या संख्येने मोबाइल व इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात केली जाते. मात्र, तपासणीच्या नावावर आयात करण्यात आलेले कंटेनर अडविण्यात आल्याने, त्यामधून आलेल्या वस्तू देशातील व्यापाऱ्यांना ताब्यात मिळण्यास नेहमीपेक्षा जास्त विलंब होत असल्याने व्यापाºयांमध्ये नाराजी आहे.

एकीकडे चीनच्या वस्तूंवर बहिष्काराचे आवाहन सोशल मीडियाद्वारे व इतरांकडून केले जात असताना, प्रत्यक्षात बाजारात मात्र चीनच्या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू असल्याने, चीनकडून आयात करण्यात येणाºया वस्तूंची आयात अद्याप सुरू असल्याचे चित्र आहे.माहिती देण्यास असमर्थतायाबाबत, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कंटेनरबाबत काहीही वक्तव्य करण्यास नकार दिला, तर कस्टमच्या अधिकाºयांशी संपर्क साधल्यावर त्यांनीही माहिती देण्यास असमर्थता दर्शविली.

टॅग्स :chinaचीन