शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अधिवेशनाच्या जखमेवर बैठकीचे मलम; पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 09:07 IST

विदर्भातील मंत्र्यांचा नागपुरात अधिवेशनासाठी दबाव

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापासून नागपूर पुन्हा एकदा वंचित राहण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून मुंबईत होण्याची शक्यता आहे. नागपूर, विदर्भाचे समाधान करण्यासाठी नागपुरात मंत्रिपरिषदेची एक बैठक मुंबईतील जुलैच्या अधिवेशनापूर्वी घेण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या जखमेवर मंत्रिपरिषदेच्या बैठकीचा मलम लावला जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत अधिवेशन मुंबईत घेण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तथापि, हे अधिवेशन नागपुरातच घ्या आणि नंतरचे हिवाळी अधिवेशनदेखील नागपुरातच घ्या, अशी आग्रही मागणी विदर्भातील मंत्र्यांनी केली. कोरोना सुरू झाल्यापासून नागपुरात अधिवेशन होऊ शकलेले नाही. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय त्या आधीचे अधिवेशन संपताना घेण्यात आला होता. मात्र, अधिवेशन पुन्हा एकदा मुंबईतच झाले. त्यामुळे नागपूर, विदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत डॉ. नितीन राऊत, डॉ. राजेंद्र शिंगणे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुनील केदार या मंत्र्यांनी पुढची दोन्ही अधिवेशने नागपुरातच झाली पाहिजेत असा आग्रह धरला. त्यावर, सध्याचे अधिवेशन संपण्याच्या शेवटच्या दिवशी पुढचे अधिवेशन नागपूरला होईल, असे जाहीर करावे आणि नंतर बदल जाहीर करता येईल, अशी भूमिका मांडून पाहिली. विदर्भातील मंत्र्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. गेल्यावेळीही घोषणा केली अन् अधिवेशन मुंबईला पळविले आताही तसेच केले तर विदर्भातील लोकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागेल, असे या मंत्र्यांनी सांगितले. त्यावर अधिवेशनाऐवजी नागपुरात मंत्रिपरिषदेची बैठक घेण्याचा उपाय समोर आला. मुख्यमंत्र्यांची शिवसेना आमदारांशी चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री शिवसेनेच्या सर्व आमदारांना वर्षा निवासस्थानी स्नेहभोजन दिले. यावेळी त्यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री मतदारसंघासाठी पुरेसा निधी देत नाहीत, अशी तक्रार त्यांनी केल्याचे समजते.औरंगाबादलाही बैठकनागपूरप्रमाणे औरंगाबाद येथे मंत्रिपरिषदेची एक बैठक विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घेण्याचे निश्चित करण्यात आले. विदर्भ आणि मराठवाडा या मागासलेल्या भागातील प्रश्नांना पावसाळी अधिवेशनात प्राधान्य दिले जाईल.