शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांचा ‘मनोरा’ पाडण्यासाठी पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:11 IST

राज्यातील आमदारांची हक्काची २५ वर्षे जुनी ‘मनोरा’ इमारत पाडण्यासाठी आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या ‘मनोरा’त मात्र आमदारांचा जीव गुंतलेला आहे. १९९३ला अस्तित्वात आलेल्या १४ माळ्यांच्या ‘मनोरा’ आमदार निवासात ३३६ खोल्या आहेत.

- राजेश निस्तानेमुंबई  - राज्यातील आमदारांची हक्काची २५ वर्षे जुनी ‘मनोरा’ इमारत पाडण्यासाठी आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. मंत्रालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या या ‘मनोरा’त मात्र आमदारांचा जीव गुंतलेला आहे.१९९३ला अस्तित्वात आलेल्या १४ माळ्यांच्या ‘मनोरा’ आमदार निवासात ३३६ खोल्या आहेत. २८४ आमदारांचे तेथे वास्तव्य आहे. यातील खोल्यांच्या छताचे प्लॅस्टर पडत असल्याच्या मंत्री व आमदारांच्या तक्रारी होत्या. काहींनी या इमारतीत जीविताला धोका होण्याची भीती व्यक्त केली. अखेर शासनाने ती इमारत पूर्णत: पाडून तेथे नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. सुमारे दोन वर्षांपासून इमारत पाडण्याची चर्चा असली तरी कुणाही आमदाराने ‘मनोरा’ सोडण्यासाठी पुढाकार घेतला नाही. उलट ही इमारत बहुतांश आमदारांना सोईची वाटते. वारंवार सांगूनही सहजासहजी कुणी ‘शिफ्ट’ होण्यास तयार नाही. म्हणून आता थेट वीज, पाणीपुरवठा खंडित करून आमदारांना बाहेर काढण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.मनोरा पाडणे व नव्याने बांधकाम करणे, ही जबाबदारी केंद्राच्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनबीसीसी) यांच्यावर सोपविली आहे. याबद्दल राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नाराजी व्यक्त केली असून आमच्या अभियंत्यांवर हा अविश्वास असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.‘मॅजेस्टिक’ चार वर्षांपासून थंडबस्त्यात९८ खोल्यांचा समावेश असलेल्या ब्रिटिशकालीन ‘मॅजेस्टिक’ आमदार निवासाची इमारत पाडण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वीच घेण्यात आला. या इमारतीच्या नव्या बांधकामाचा नकाशा मंजूर आहे, सर्व परवानग्याही मिळाल्या आहेत. २५० कोटींची तरतूदही झाली आहे. त्यानंतरही त्याच्या निविदा काढल्या जात नाहीत. चार वर्षांपासून हे काम थंडबस्त्यात आहे.आमदारांना एक लाख : ‘मनोरा’मध्ये वास्तव्य असलेल्या आमदारांना पर्यायी व्यवस्थेसाठी मासिक एक लाख रुपये दिले जाणार आहेत.

टॅग्स :ManoraमानोराMumbaiमुंबई