शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार

By admin | Updated: June 16, 2014 20:02 IST

मान्सून प्रणाली सक्रिय झाली असून, भूपृष्ठावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यामुळे येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.

अकोला : मान्सून प्रणाली सक्रिय झाली असून, भूपृष्ठावरील पाण्याचे तापमानही वाढले आहे. यामुळे येत्या पाच ते सहा दिवसात राज्यात सर्वत्र मान्सून बरसणार असल्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.दरम्यान, मान्सून लांबल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागले आहे.गतवर्षी मान्सून वेळेवर म्हणजेच ७ जूनला सुरू झाला होता. विदर्भाचा विचार केला, तर यावर्षी त्याला उशीर झाला आहे. अकोला जिल्ह्यात सामान्यत: ११ ते १७ जूनपर्यंत मान्सून बरसतो. तथापि, यावर्षी या अंदाजानुसार तो चार ते पाच दिवस उशिराने येत आहे. यावर्षी मान्सून सक्रिय होताच हलकेसे चक्रीवादळ तयार झाले होते. त्यामुळे मान्सून प्रक्रियेची गती मंदावली होती. आता पुन्हा ती गती वाढली आहे.दरम्यान, कमाल तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकशावर आधारित कृषी हवामान शास्त्रज्ञांनी यावर्षी जून ते सप्टेबरपर्यंत महाराष्ट्रातील सहा स्थानिकांचा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यात पश्चिम विदर्भ विभागात सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. अकोला जिल्ह्यात जून ते सप्टेबर या कालावधीत सरासरी ६८३.७ मिमी. पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कृषी हवामान विभागनिहाय मध्य विदर्भातील नागपूर जिल्ह्यात चार महिन्यात सरासरी ९५८ एकूण ९८७ मि.मी. पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस १०३ टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्यात सरासरी व एकूण ८८२ मि.मी. पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसाची टक्केवारी १०० आहे. पूर्व विदर्भात शिंदेवाई (चंद्रपूर) जिल्ह्यात जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरी व एकूण ११९१ मि.मी. म्हणजेच १०० टक्के पावसाचे अनुमान आहे. मराठवाड्यात परभणीला चार महिन्यात सरासरी ८१५ एकूण ८९६ मि.मी. म्हणजेच १०९ टक्के पाऊस होणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. कोकण विभागात दापोलीला सरासरी ३३३९ मि.मी. पावसची शक्यता वर्तविली आहे. हे जून जे सप्टेंबर महिन्यातील पावसाचे प्रमाण ९७.५ टक्के आहे. -खंड पडण्याची शक्यताअकोला, नागपूर आणि परभणी भागात पावसाचा खंड पडण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. -विदर्भात सरासरी एवढ्या पावसाची शक्यता अकोला, यवतमाळ आणि शिंदेवाई (चंद्रपूर) येथे सरासरी एवढ्या पावसाची शक्यता असून, नागपूर येथे मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भाचा विचार केल्यास सरासरी एवढा पाऊस होण्याची शक्यता आहे.