शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

राज्यात पावसाचा जोर ओसरला; नाशकात मात्र मुसळधार, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 03:06 IST

राज्यभरात धुमशान कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरल्याने सर्वांनिच सुटकेचा नि:श्वास सोडला. नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम होता.

पुणे/मुंबई : राज्यभरात धुमशान कोसळलेल्या पावसाचा जोर बुधवारी ओसरल्याने सर्वांनिच सुटकेचा नि:श्वास सोडला. नाशिक जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर कायम होता. सतत मुसळधार पडत असणाºया पावसाने गोदावरीसह इतर नद्यांना आलेला पूर कायम आहे. मध्य गुजरात व लगतच्या भागावर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र आता सौराष्ट्र व गुजरातच्या उत्तरेकडील भागाकडे सरकले आहे़ त्यामुळे पावसाचा जोर चांगलाच ओसरला आहे. मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी रिमझीम पाऊस होता.गगनबावड्यात २० बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने नद्यांना पूर आला असून, तब्बल २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. एक राज्यमार्ग तर तीन प्रमुख जिल्हामार्ग बंद झाला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यात आठ घरांच्या पडझडीत सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.

नाशकात पूरस्थिती कायमनाशिक शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. सायंकाळी पाचपर्यंत १३४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार कायम राहिल्याने धरणातून विसर्ग सुरू राहिल्याने गोदावरी, दारणा नद्यांची पूरपरिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

गोसेखुर्दचे दरवाजे उघडलेविदर्भात गोसीखुर्द धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस कायम राहिला आहे. तो राहिल्याने धरणाचे सर्व म्हणजे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीला पूर आला आहे.

कोकणात अतिवृष्टीचा इशाराउत्तर कोकण व गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी ६४ ते ११५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता़ असून सौराष्ट्र आणि कच्छ मध्ये तुरळक ठिकाणी ११५ ते २०४ मिमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.पुणे ४, कोल्हापूर ३, महाबळेश्वर १९, नाशिक ३, सांगली ०़३, सातारा १, अलिबाग २, रत्नागिरी २, पणजी २, डहाणु ४, भिरा ४, अकोला ०़३, अमरावती १ मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली.