शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

विरार-अलिबाग कॉरिडोरला आता जुलै २०२१चा मुहूर्त! भूसंपादनासह निविदा प्रक्रिया करणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 2:39 AM

प्रस्तावित मार्गिकेमुळे चिरनेर परिसरातील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढून मार्गिकेत बदल करण्याच्या सूचना एमसीझेडएमच्या बैठकीत देण्यात आल्या.

मुंबई : विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरचे काम आॅगस्ट, २०२० पासून सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन फसले. मात्र, हा रस्ता आता राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतरित झाल्यानंतर येत्या काही महिन्यांत भूसंपादन प्रक्रियेला वेग देत पुढील वर्षी जुलैमध्ये या कामासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

विरार ते अलिबाग १२८ किमी लांबीचा हा कॉरिडोर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण व अलिबाग या क्षेत्रातून जातो. जेएनपीटी, नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला तो जोडला जाईल. या मार्गिकेमुळे या संपूर्ण परिसराची सर्वार्थाने प्रगती करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. मार्गिकेच्या बांधकामासाठी १९ हजार कोटी तर भूसंपादनासाठी १५ हजार ६१७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने १४ जून २०१८ रोजी या कामाला तत्त्वत: मान्यता दिली. दोन महिन्यांपूर्वी हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीला देण्यात आली.

या कॉरिडोरसाठी आवश्यक परवानग्या जुलै, २०२० पर्यंत मिळतील. त्यानंतर काम सुरू करून आॅगस्ट, २०२५ पासून मार्गिका सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, सीआरझेड आणि पर्यावरण विभागाच्या परवानग्या अद्याप मिळालेल्या नाहीत.प्रकल्प कार्यान्विततेसाठी पाठपुरावा सुरूप्रस्तावित मार्गिकेमुळे चिरनेर परिसरातील पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढून मार्गिकेत बदल करण्याच्या सूचना एमसीझेडएमच्या बैठकीत देण्यात आल्या. याबाबत मोपलवार यांना विचारले असता, प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या लवकरात लवकर मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. रस्त्यासाठी आवश्यक जागांच्या भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू केली असून, जानेवारी अखेरपर्यंत बऱ्यापैकी भूसंपादन होईल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Virarविरारalibaugअलिबाग