शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
3
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
4
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
5
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
6
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
7
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
8
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
9
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
10
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
11
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
12
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
13
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
14
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
16
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
17
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
18
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
19
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
20
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव

रुग्ण महिलेचा विनयभंग: डॉक्टरला अटक

By admin | Updated: August 24, 2016 20:48 IST

तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलाचा विनयभंग करणा-या डॉक्टर अमेर पंजवानी (44) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 24 - तपासणीसाठी आलेल्या रुग्ण महिलाचा विनयभंग करणा-या डॉक्टर अमेर पंजवानी (44) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आतच पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन याप्रकरणी 20 पानांचे आरोपत्रही दाखल केले आहे. अशा प्रकारे जलदगतीने आरोपत्र दाखल होण्याची ही दुसरी घटना असल्याची माहिती सूत्रंनी दिली.

कल्याण येथे राहणारी ही 30 वर्षीय महिला मुंबईच्या एका नामांकित कंपनीत एव्हेंट व्यवस्थापनाचे काम करते. ती गेल्या दोन वर्षापासून पाठीच्या आजाराने ग्रस्त आहे. तिच्या एका मित्रने दिलेल्या माहितीनुसार ती ठाण्याच्या नौपाडय़ातील डॉ. पंजवानी यांच्या स्पेक्ट्रम क्लिनिक मध्ये मंगळवारी सायंकाळी 6.30 वा. च्या सुमारास तपासणीला गेली होती. त्यावेळी या डॉक्टरने तिच्याशी गैरवर्तन केले.

सुरुवातीला तिने प्रतिकार केल्यानंतरही त्याने हा प्रकार दोन ते तीन वेळा केल्याने तिने आरडाओरडा केला. याप्रकरणी तिने नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध रात्री 11 वा. च्या सुमारास गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पी. डी. लोंढे यांच्या पथकाने त्याला अवघ्या तासाभरातच अटक केली. घटनास्थळाचा पंचनामा, मुलीची आई आणि मित्र यांचे जबाब नोंदविल्यानंतर याप्रकरणी आरोपपत्रही बुधवारी दुपारी 2 वा. च्या सुमारास ठाण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राई यांच्या न्यायालयात त्यांनी दाखल केले. त्याची न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशमहिलांवरील अत्याच्याराच्या गुन्ह्यांच्या संदर्भात पंचनामे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावा तसेच कलम 164 नुसार न्यायालयात साक्षीदार आणि फिर्यादी यांचे जबाब झाल्यानंतर तातडीने आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक प्रविण दिक्षित यांनी दिले होते. त्याच आदेशानुसार नौपाडयात यापूर्वी उपनिरीक्षक भिमराव सुलताने यांनीही एका विनयभंग प्रकरणाचे आरोपपत्र अवघ्या 24 तासांतच दाखल केले होते. त्यानंतर आता हे दुसरे आरोपपत्र दाखल झाले आहे.