शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मोदींचा प्रभाव फिफ्टी-फिफ्टी

By admin | Updated: October 20, 2014 07:01 IST

तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार पराभूत झाले. विदर्भ मोदी यांच्या गोंदिया येथील सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल २७ प्रचार सभा घेतल्या, त्यांच्या सभांना मिळालेल्या प्रतिसादामुळे प्रचंड मोठा झंझावात निर्माण होईल आणि या भागांत भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार निवडून येतील असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र रविवारी जाहीर झालेल्या निकालांनी हा अंदाज खोटा ठरवला. मोदी यांनी सभा घेतलेल्या ठिकाणांपैकी निम्म्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पहावे लागले.पंतप्रधान मोदी यांच्या तासगाव आणि बारामतीतील सभेला प्रचंड गर्दी उसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार आर. आर. पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. परंतु हे दोन्ही उमेदवार सहज निवडून आले. मोदींनी विदर्भात गोंदिया, ब्रम्हपुरी आणि धामणगाव मतदारसंघात सभा घेतल्या. परंतु या तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार पराभूत झाले. विदर्भ मोदी यांच्या गोंदिया येथील सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु येथे काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल विजयी झाले. ब्रम्हपुरी येथे भाजपचे अतुल देशकर पराभूत झाले. धामणगाव येथेही भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचा पराभव झाला.नाशिक (पूर्व) नाशिक (पूर्व) मतदारसंघात भाजपाचे बाळासाहेब सानप यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय. याशिवाय नाशिक शहरातील अन्य दोन मतदारसंघांमधील भाजपा उमेदवारांनाही मोदी यांच्या सभेमुळे मदत झाली.नांदेडलोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील लोहा शहरात पंतप्रधानांची मोठी सभा झाली होती. परंतु तिथे शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर ४६ हजार ६६३ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. लोहा-कंधार लगत असलेल्या मुखेड मतदारसंघात भाजपाच्या गोविंद राठोड यांना समाजाचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे आणि विद्यमान आमदारांवरच्या नाराजीमुळेच राठोड यांना यश मिळविले. उस्मानाबाद : चारही उमेदवार तिसर्‍या क्रमांकावरजिल्ह्यातील चारही मतदारसंघांत भाजपा तिसर्‍या क्रमांकावर फेकली गेली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुळजापूर येथे जंगी प्रचारसभा झाली होती.मात्र येथेही मतदारांनी काँग्रेसच्या पाठीशी राहणेच पसंत केल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येते. उस्मानाबाद मतदारसंघात भाजपाच्या संजय पाटील दुधगावकर यांना २६हजार ८१ मते मिळाली.परंडा मतदारसंघातील भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रासपाचे उमेदवार बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांना ३७हजार ३२४ तर उमरगा येथील भाजपा उमेदवार कैलास शिंदे यांना ३0हजार ५२१आणि तुळजापूर मतदारसंघातील भाजपा उमेदवार संजय निंबाळकर यांना ३६हजार ३८0मते मिळाली.भाजपाचे हे चारही उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर राहिले. पंतप्रधान मोदी यांच्या तासगाव आणि बारामतीतील सभेला प्रचंड गर्दी उसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार आर. आर. पाटील आणि अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. परंतु हे दोन्ही उमेदवार सहज निवडून आले. विदर्भात भाजपाने बाजी मारल्याचे स्पष्ट दिसते. सोलापूर : मोदी यांनी पंढरपूर येथे घेतलेल्या सभेचा सोलापूर जिल्ह्यावर काहीही परिणाम झाला नाही. पंढरपूर येथे स्वाभिमानीचे प्रशांत परिचारक यांचा काँग्रेसच्या भारत भालके यांनी पराभव केला. शेजारच्या सर्वच मतदारसंघांत भाजप आणि मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला. अहमदनगर : जिल्ह्यात १२पैकी पाच मतदारसंघांत भाजपाचे उमेदवार निवडून आले. कोपरगावमध्ये स्नेहलता कोल्हे, पाथर्डीत मोनिका राजळे विजयी झाल्या. नेवासात बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांना पराभूत केले. श्रीगोंद्यात भाजपाचे पाचपुते पराभूत झाले. राहुरीत भाजपाचे शिवाजी कर्डिले यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. पक्षानुसार आढावाविधानसभेनंतर कोणत्या मतदारसंघात कोणत्या विभागात कोणत्या पक्षाने बाजी मारली, त्याचा महाराष्ट्राच्या नकाशानुसार घेतलेला आढावा.. भाजपाशिवसेनाकाँग्रेसराष्ट्रवादीमनसेइतर सोलापूर : मोदी यांनी पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यासाठी सभा घेतली. तिथे काँग्रेसच्या भारत भालके यांनी परिचारक यांचा सुमारे आठ हजार मतांनी पराभव केला. शेजारच्या सर्वच मतदारसंघांत भाजप आणि मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला. जिल्ह्यात पूर्वी भाजपाचे दोन आमदार होते. याही निवडणुकीत विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोनच उमेदवार निवडून आले. पुणे जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व दिसून आले.