शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करण्याची मोदींची हाक

By admin | Updated: June 1, 2014 00:57 IST

महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये होणा:या विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष अधिक बळकटीने कामाला लावण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली.

शिथिलता नको : भाजपा सरचिटणीसांशी चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणिसांची भेट घेऊन महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये होणा:या विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष अधिक बळकटीने कामाला लावण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र व हरियाणात पावसाळ्य़ानंतर लगेच तर झारखंड, जम्मू-काश्मीर व बिहारमध्ये वर्षअखेर विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. 
मोदींनी भाजपाच्या 1क् सरचिटणिसांना सकाळी आपल्या निवासस्थानी न्याहारीसाठी बोलावले व त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. पक्षनेत्यांनी सामान्य नागरिक व सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच प्रशासन अधिक सक्षम व पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सूचना करण्याचेही त्यांना आवाहन केले.
मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पक्षनेत्यांशी त्यांनी एकत्रितपणो घेतलेली ही पहिलीच भेट होती. या न्याहारी बैठकीस भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह राम लाल, अमित शहा, अनंत कुमार, धर्मेद्र प्रधान, वरुण गांधी, राजीव प्रताप रुडी. थावरचंद गेहलोत, जे. पी. नड्डा, तपिर गाओ व मुरलीधर राव हे सरचिटणीस हजर होते. पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाच्या केंद्रीय पदाधिका:यांपैकी अनेक नेते सरकारमध्ये सामील झाल्याने पक्षात लवकरच नवे पदाधिकारी नेमावे लागणार आहेत. यादृष्टीनेही या बैठकीस महत्त्व दिले जात आहे.
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर पक्षसंघटनेत शिथिलता येऊ नये व आगामी विधानसभा निवडणुकांसाठीही पक्षसंघटना अशाच निवडणूक ‘मोड’मध्ये राहावी यासाठी मोदींनी ही बैठक घेतल्याचे वरिष्ठ पक्षनेत्यांचे म्हणणो आहे. सामान्य लोक आणि पक्ष समर्थकांकडून येणा:या सूचनांचा सुशासनासाठी कसा उपयोग करून घेता येईल, यावरही त्यांनी विचारविनिमय केल्याचे कळते. 
 
‘केंद्रात नरेंद्र अन् राज्यात
देवेंद्र’ घोषणा चांगलीच
च्औरंगाबाद : ‘केंद्रात नरेंद्र अन राज्यात देवेंद्र’ ही घोषणा चांगलीच असल्याचे सांगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंढे यांनी महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा भाजपाचा असल्याचे सुचोवात करीत मुख्यमंत्रीपदासाठी भाजपात सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर शिक्कामोर्तब केले. 
च्केंद्रीय ग्रामविकासमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर मुंडे शनिवारी पहिल्यांदाच शहरात आले होते. ‘केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र’ ही घोषणा कशी वाटते? पत्रकारांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना बराच मोठा ‘पॉज’ घेत मुंडे म्हणाले, ‘चांगली वाटते’. तत्पूर्वी राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही मुख्यमंत्रीपदाचा दावा करीत आहेत, असा प्रश्न विमानतळातून बाहेर पडताना पत्रकारांनी मुंडे यांना  विचारला होता. तेव्हाही संदिग्ध उत्तर देत ते म्हणाले, महायुती राज्याचे नेतृत्व करील़
 
च्रविवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी अशोक रोडवरील भाजपाच्या राष्ट्रीय मुख्यालयास भेट देऊन पक्षाचे पदाधिकारी व कार्यालयीन कर्मचा:यांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतील. घेतलेल्या कष्टांची बक्षिसी म्हणून सुमारे 1क्क् कार्यालयीन कर्मचा:यांना तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्याची घोषणा या वेळी केली जाईल, असे समजते.
 
पक्षाध्यक्ष पदावर चर्चा
भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंग सरकारमध्ये सामील झाल्याने त्यांच्याजागी पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, यावर मोदी यांनी शुक्रवारी रात्री स्वत: राजनाथ सिंग व माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.