शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

मोदींच्या नव्हे तर पवारांच्या सभा घेणार का?

By admin | Updated: October 6, 2014 00:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा

जावडेकरांची टीका: बाळासाहेब असते तर युती तुटली नसतीनागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांवर विरोधकांकडून होणारी टीका हास्यास्पद आहे. मोदी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्या सभा घ्यायच्या नाही तर मग का पवारांच्या सभा घ्यायच्या का? अशी टीका भाजप नेते व केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच वन व पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे केली. भाजप संपूर्ण बहुमत घेऊन राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जावडेकर यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत वरील मत व्यक्त केले. मोदींच्या राज्यातील प्रचार सभांवर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेसह इतरही काही पक्षांनी केलेल्या टीकेकडे जावडेकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, मोदींच्या सभांवर आक्षेप घेणे हे एखाद्या संघाला त्यांच्या कर्णधाराशिवाय खेळण्याची अट घालण्यासारखा प्रकार आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोदी हे या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या सभा होणे स्वाभाविक आहे. भाजप मोदींच्या सभा घेणार नाही तर काय पवारांच्या सभा घेणार का, असा प्रतिसवाल जावडेकर यांनी यावेळी केला.भाजपकडे स्थानिक नेतृत्वाची वानवा असल्याने मोदींचा वापर केला जात असल्याची टीकाही त्यांनी फेटाळून लावली. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न करणे हा धोरणाचा नव्हे तर डावपेचाचा भाग आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत एकाही पक्षाने मुख्यमंत्रिपदासाठी एक विशिष्ट नाव पुढे केले नव्हते. आताच हा प्रश्न का विचारला जातो? भाजपकडे या पदासाठी अनेक सक्षम नेते आहेत. निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जावडेकर म्हणाले. देशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या पदरी अपयश आले. मात्र महाराष्ट्रात अशी स्थिती राहणार नाही. पोटनिवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढविल्या जातात तर सार्वत्रिक निवडणुका या राज्याच्या भविष्य ठरविणाऱ्या असतात. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडी सरकारला कंटाळलेली जनता मोदींच्या नेतृत्वात भाजपवर विश्वास व्यक्त करेल व पक्षाला बहुमत मिळेल. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले उद्ध्वस्त झालेले पाहायला मिळतील. ‘राष्ट्र के साथ, महाराष्ट्र’ असे राज्यातील जनतेने मन तयार केले आहे, असे जावडेकर म्हणाले.संघाच्या दसरा कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्याचे त्यांनी समर्थन केले. दूरदर्शन हे स्वायत्त आहे. त्यांचा निर्णय ते स्वत: घेतात. सरकार त्यात हस्तक्षेप करीत नाही. संघाच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी होती ती फक्त उठवण्यात आली. दूरदर्शनच नव्हे तर इतर वाहिन्यांनीही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले. याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा विरोधकांचा प्रचार खोटा आहे. महाराष्ट्र गुजरातचा मोठा भाऊ आहे हे खुद्द मोदींनीच स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडे मुद्दे नसल्याने ते वाटेल तसे आरोप करीत आहे, असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)