शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’ला मोदी-पवारांचे मनोमिलन

By admin | Updated: January 22, 2015 01:30 IST

विधानसभा निवडणुकीत पवार चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येत आहे.

बारामती : विधानसभा निवडणुकीत पवार चुलत्या-पुतण्याच्या गुलामगिरीतून बारामतीला मुक्त करा, असे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येत असून त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. हा कार्यक्रम नेमका ‘व्हॅलेंटाईन डे’ला होत असल्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा मनोमिलन सोहळा असल्याचे मानले जात आहे.बारामतीत शरद पवार अध्यक्ष असलेले विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल आणि कृषी विकास प्रतिष्ठान संस्था अशी दोन शैक्षणिक संकुले आहेत़ त्यापैकी कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून बांधण्यात आलेले दिनकर सभागृह, शेतकरी निवास आणि सेंटर फॉर एक्सलन्स या नव्या इमारतींचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. यासाठी बुधवारी पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्यासह जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमप आदी उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीतील ‘प्रचारी टीका’ विसरून पवारांनी मोदींचे कौतुक केले. एवढेच नाही तर स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसादही दिला. त्यामुळे उभयतांमधील कटुता निवळली असल्याचे मानले जाते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषी विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मोदी यांनी स्वीकारले असून १४ फेब्रुवारीला मोदी यांचा दौरा निश्चित झाला आहे. मोदींच्या समोर बारामतीच्या विकासाचा आढावा चित्रफितीतून दाखविला जाणार असून विधानसभेच्या प्रचारात मोदींनी केलेला आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आहे. (प्रतिनिधी)च् मोदींच्या समोर बारामतीच्या विकासाचा आढावा चित्रफितीतून दाखविला जाणार असून विधानसभेच्या प्रचारात मोदींनी केलेला आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आहे.