शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मोदी-जेटलींनी जनतेला फसवले

By admin | Updated: February 15, 2016 04:04 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी स्विस बँकेतील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनी स्विस बँकेतील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरले. त्यासाठी दोघांनी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. उलट जनतेची फसवणूकच केली, असा हल्लाबोल ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी रविवारी केला. काँग्रेस काय किंवा भाजपा काय सगळेच एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.पंडित जवाहरलाल नेहरु सभागृह येथे टॉप मॅनेजमेंट काँझोरिअमच्या वतीने ‘इफेक्टिव्ह फंक्शनिंग आॅफ पार्लमेंट फॉर व्हायब्रंट डेमॉक्रॉसी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब मुजुमदार, माजी न्यायमूर्ती पी. बी़ सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. जेठमलानी म्हणाले, ‘काळ्या पैशांचा साठा करणाऱ्या व्यक्तींची यादी २०१०मध्ये स्विस बँकेकडून जर्मनीला देण्यात आली होती. मात्र, भारताने ही यादी मिळण्यासंबंधी साधे पत्रही लिहिले नाही. उलट स्वित्झर्लंडबरोबर पूर्वीचे काही मागणार नाही, अशा स्वरूपाचा ‘दुहेरी कर आकारणी टाळण्याचा’ करार करण्यात आला. तरीही विरोधी पक्षातील असल्याने ती यादी मिळावी, अशी मागणी मी जर्मन सरकारला पत्राद्वारे केली. त्यावर ‘विरोधी पक्षनेत्याचे पत्र द्या,’ असे मला सांगण्यात आले. मात्र, लालकृष्ण आडवाणी यांनी मला पत्र दिले नाही.’ ‘लोकसभा निवडणुकीत भाजपाने हाच मुद्दा घेतला आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन जनतेला दिले. या एका मुद्द्यासाठी बिहार निवडणुकीमध्ये आपण भाजपाचा प्रचार केला, परंतु मोदी आणि जेटलींनी काळा पैसा परत आणण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)